घरदेश-विदेशनासाच्या ऑर्बिटरने काढले विक्रम लँडरचे नवे फोटो

नासाच्या ऑर्बिटरने काढले विक्रम लँडरचे नवे फोटो

Subscribe

चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडर चंद्रावर नेमक्या कोणत्या ठिकाणी पडले याचा पत्ताच लागत नव्हता. पण आता त्याचा शोध लागला असून नासाच्या उपग्रहाने विक्रम लँडरचे फोटो नासाने ट्विट केले आहेत.

भारताच्या चांद्रयान २ या मोहिमेतील विक्रम लँडरचा पत्ता शोधण्यात ‘नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेला यश आलं आहे. नासाच्या एका उपग्रहाने विक्रम लँडरच्या खाणाखुणा शोधल्या आहेत. दरम्यान चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडर चंद्रावर नेमक्या कोणत्या ठिकाणी पडले याचा पत्ताच लागत नव्हता. पण आता त्याचा शोध लागला असून नासाच्या उपग्रहाने विक्रम लँडरचे फोटो नासाने ट्विट केले आहेत.

विक्रम लँडरचे अवशेष सापडले; नासाचा दावा

दरम्यान नासाच्या एलआरओ या ऑर्बिटरने चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडरचा शोध लावला आहे. याबाबतचे ट्विट नासाने केले आहे. चांद्रयान २ मोहिमेत विक्रम लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होणे गरजेचे होते. पण लँडिंग दरम्यान विक्रमशी संपर्क तुटल्याने विक्रमचे पुढे काय झाले याबाबत माहिती मिळणे कठीण झाले. आता नासाच्या एलआरओ ऑर्बिटरने चंद्राच्या पृष्ठभागावरील विक्रम लँडरच्या खाणाखुणा शोधून काढल्या आहेत. त्यानुसार विक्रम लँडरचे तुकडे झाल्याची माहिती मिळते. नासाच्या ऑर्बिटरने काढलेल्या छायाचित्रांनुसार चंद्रावर ज्या ठिकाणी विक्रम लँडर पडले त्या भूमीपासून ७५० मीटर लांब विक्रम लँडरचे तीन अवशेष आढळले आहेत असा दावा नासाने केला आहे. विशेष म्हणजे नासाच्या या ऑर्बिटरने एक किलोमीटर अंतरावरुन विक्रमची छायाचित्रं टिपली आहेत.

- Advertisement -

नासाचं ट्विट

ऑर्बिटरने विक्रम लँडरचे काढलेले फोटो ट्विट करत नासाने म्हटले आहे की, ७ सप्टेंबर रोजी इस्त्रोने चांद्रयान २ अंतराळात पाठवले. चंद्रापासून २ किमी अंतरावर असताना विक्रमचा संपर्क तुटला. दरम्यान चंद्राच्या कक्षेतील ऑर्बिटरने विक्रम लँडर कुठे पडले याबाबतचे संभाव्य फोटो इस्त्रोला पाठवले होते. पण आता नासाच्या ऑर्बिटरने विक्रमचा ठावठिकाणा शोधून काढला आहे. ‘यापूर्वी विक्रम लँडरचे काही फोटो समोर आले होते. पण फिक्सेल चांगले नसल्याने विक्रम लँडरची पडताळणी करणं कठीण होतं. पण आता ऑर्बिटरने कालच विक्रम लँडरच्या ठिकाणाचे नव्याने फोटो घेतले आहेत.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -