घरट्रेंडिंगइस्त्रो थांबणार नाही; चांद्रयान ३ मोहिमेला सुरुवात!

इस्त्रो थांबणार नाही; चांद्रयान ३ मोहिमेला सुरुवात!

Subscribe

चांद्रयान-३ मोहिमेला सुरुवात.

२० ऑगस्ट २०१९ या दिवशी तमाम भारतीयांमध्ये दु:ख आणि निराशेचं वातावरण होतं. इस्त्रोनं २२ जुलै २०१९ रोजी अवकाशात प्रक्षेपित केलेलं चांद्रयान २ चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या (सॉफ्ट लँडिंग) उतरू शकलं नाही. चांद्रयान २चं हार्ड लँडिंग झाल्यामुळे या मोहिमेत अपेक्षित यश मिळू शकलं नाही. त्या दिवशी चांद्रयानाचं चंद्राच्या पृष्ठभागावर होणारं लँडिंग पाहाण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील इस्त्रोच्या केंद्रामध्ये उपस्थित होते. यावेळी मोहीम अपयशी झाल्यानंतर मोदींच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडणारे इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांचं छायाचित्र अवघ्या देशानं पाहिलं होतं. मात्र, आता तेच के. सिवन पुन्हा एकदा आत्मविश्वासाने प्रसारमाध्यमांसमोर आले आहेत. बुधवारी म्हणजेच नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी के. सिवन यांनी देशवासीयांना एक खुशखबर दिली आहे. चांद्रयान-३ मोहिमेच्या प्रारंभाची!

- Advertisement -

के. सिवन यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन चांद्रयान-३ मोहिमेविषयी माहिती दिली. ‘केंद्र सरकारने चांद्रयान-३ मोहीमेला मान्यता दिली आहे. इस्त्रोने या प्रकल्पाला सुरुवात केली आहे’, असं सिवन यांनी यावेळी सांगितलं. तसेच, या प्रकल्पासाठी स्वतंत्र अंतराळ केंद्र देखील उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ‘तमिळनाडूमधल्या तुतुकुडीमध्ये हे दुसरं अंतराळ केंद्र असेल’, असं ते म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, यावेळी सिवन यांनी चांद्रयान-२ मोहिमेविषयी देखील प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ‘चांद्रायन-२ मोहिमेमध्ये आम्ही चांगली प्रगती केली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर जरी यान यशस्वीरीत्या उतरू शकलं नसलं, तर त्याचा ऑर्बिटर मात्र अजूनही काम करत आहे. हा ऑर्बिटर पुढची ७ वर्ष काम करत राहणार आहे. ऑर्बिटरने गोळा केलेल्या वैज्ञानिक माहितीची संशोधनात मोठी मदत होणार आहे’, असं सिवन यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -