घरदेश-विदेशजुने डेबिट कार्ड ३१ डिसेंबर पूर्वी बदलाच

जुने डेबिट कार्ड ३१ डिसेंबर पूर्वी बदलाच

Subscribe

नव्या बदलानुसार तुमच्या जुन्या कार्डमधील मॅगस्ट्रिप ईव्हिएम चीप काढून युरोपे, मास्टरकार्ड आणि व्हिसा चीप असलेले कार्ड देण्यात येणार आहे. त्यामुळे मॅगस्ट्रिप असलेले जुने कार्ड १ जानेवारीपासून वापरता येणार नाही.

२०१८ हे वर्ष संपायला आले असून जर तुमची काही महत्वाची कामे करायची राहून गेली असेल तर ती आताच करुन घ्या. त्यात एटीएम कार्ड बदलण्याचे काम राहून गेले असेल तर ते सुद्धा तातडीने करुन घ्या नाहीतर तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासाठी अडचणी येऊ शकतात. नव्या कार्डासाठीच्या प्रक्रिया बँकांमध्ये सुरु झाल्याअसून ग्राहकांनी कार्ड बदलून घेण्याचे आदेश आरबीआयने दिले आहे. ३१ डिसेंबरपूर्वी हा बदल करुन घ्यायचा आहे.

बँकांकडून लोन हवे आहे, मग ‘या’ पाच गोष्टी करा

परिपत्रक केले जारी

जुने कार्ड बदलण्याची प्रक्रिया ३१ डिसेंबरपर्यंत करुन मिळणार आहे. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड धारकांसाठी हा बदल अनिवार्य करण्यात आला आहे. जुन्या कार्डात असलेले ‘मॅग्नेटिक स्ट्राईप’ ही सुविधा बंद करण्यात येणार आहे.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून २७ ऑगस्ट २०१५ रोजी या संदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे. पण अद्यापही जर तुम्ही नवीन कार्ड घेतले नसेल तर ते वेळीच बदलून घ्या.

- Advertisement -
बँकांची Fake Apps चोरतात ग्राहकांचा डेटा

नव्या कार्डात का केला बदल?

नव्या बदलानुसार तुमच्या जुन्या कार्डमधील मॅगस्ट्रिप ईव्हिएम चीप काढून युरोपे, मास्टरकार्ड आणि व्हिसा चीप असलेले कार्ड देण्यात येणार आहे. त्यामुळे मॅगस्ट्रिप असलेले जुने कार्ड १ जानेवारीपासून वापरता येणार नाही. ईव्हिएम चीपमुळे झालेल्या फसवणुकीच्या घटना आपण पाहिल्या आहेत. चीपमधील नंबर स्कॅन करुन कॅश काढल्याच्या घटना या पूर्वी अनेकदा घडल्या आहेत.शिवाय डेटा चोरी होण्याची भितीही जास्त होती. त्यावर निर्बंध आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे नवीन कार्ड घेण्यासाठी कोणताही शुल्क भरावा लागणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -