घरदेश-विदेशकाँग्रेस पक्षात बदल; खरगे, गुलाम नबी यांना महासचिव पदावरून हटवले

काँग्रेस पक्षात बदल; खरगे, गुलाम नबी यांना महासचिव पदावरून हटवले

Subscribe

काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, तसेच मल्लिकार्जुन खरगे यांना महासचिव पदावरून हटवण्यात आले आहे. गुलाम नबी आझाद हे हरयाणाचे प्रभारी होते. तर, अजय माकन आणि रणदीप सुरजेवाला यांच्या नावांचा समावेश काँग्रेसच्या महासचिव पदांच्या यादीत करण्यात आला आहे. तसेच अंबिका सोनी आणि मोतीलाल व्होरा यांनादेखील काँग्रेस पक्षाने डच्चू दिला आहे. या फेरबदलात काँग्रेसला सल्ला देणाऱ्या उच्चस्तरीय सहा सदस्यीय विशेष समितीत रणदीप सुरजेवाला यांचा समावेश करण्यात आहे आहे. तसेच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये आलेले बिहारचे नेते तारिक अन्वर यांना महासचिव पद देण्यात आले असून सोनिया गांधी यांना मोठी जबाबदारी दिली आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये पत्र लिहून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर पक्षाचे अध्यक्षपद बदलण्याबाबत चर्चा झाली. हे पत्र लिहून वादळ निर्माण करणारे गुलाम नबी आझाद यांना महासचिव पदावरून हटवण्यात आले आहे. आता ते काँग्रेस कार्यकारणीचे सदस्य आणि राज्यसभेत पक्षाचे नेते असतील. तर मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून महाराष्ट्राचे प्रभारी पद काढून घेण्यात आले आहे. आता एच. के. पाटील महाराष्ट्राच्या प्रभारीपदी असणार आहेत.

रणदीप सिंह सुरजेवाला यांना प्रमोशन देण्यात आले आहे. त्यांना कर्नाटकचे प्रभारी बनवण्यात आले असून कार्यकारीणतही स्थान देण्यात आले आहे. त्याच बरोबर कांग्रेस अध्यक्षांना मदत करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली आहे त्यातही त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

‘प्रेमनगरी’ आग्र्यात खळबळ! पत्नीला प्रियकरासह रंगेहात पकडलं; पतीनं चपलेनं थोबडवलं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -