घरदेश-विदेशभाषणानंतर परतणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याची जीभ छाटली

भाषणानंतर परतणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याची जीभ छाटली

Subscribe

'तुझे भाषण देनेका बहुत शौक है ना? अब तेरी जीभ काटते है' असं म्हणत काँग्रेसच्या कार्यकर्त्याची चक्क जीभ छाटली गेली आहे. छत्तीसगडमध्ये सध्या विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून हा प्रचार कार्यकर्त्याच्या जीवावर उठला आहे.

आज त्यानं खूप भाषणं केलं. विरोधकांवर जोरदार टिकास्त्र डागलं. पण त्याला काय ठावूक की हे भाषणं त्याचं शेवटचं ठरणार आहे. याच भाषणानंतर त्याची जीभ छाटली जाणार आहे. तुमचा विश्वास बसत नसेल ना या साऱ्या गोष्टींवर? पण हे सत्य आहे. भाषणानंतर काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला त्याची जीभ गमवावी लागली आहे. नव्हे ती छाटली गेली! छत्तीसगडमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारांची राळ उडताना दिसत आहे. आरोप – प्रत्यारोपांना देखील दिवसेंदिवस जोर चढत आहे. पण, या  निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची चक्क जीभच छाटली गेली आहे. राहुल दानी असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. काँग्रेसचे उमेदवार रविंद्र चौबे यांच्या प्रचारसभेत भाषण केल्यानंतर अज्ञातांनी राहुल दानी यांच्यावर हल्ला केला. यावेळी राहुल दानी एका ढाब्यावर जेवण घेत होते. यावेळी झालेल्या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाले. त्यानंतर ‘तुझे भाषण देनेका बहुत शौक है ना? अब तेरी जीभ काटते है’ असं म्हणत हल्लेखोरानी राहुल दानीची जीभ छाटली आणि पसार झाले. त्यानंतर गंभीर असलेल्या राहुल दानी यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास तीन दिवसाच्या उपचारानंतर राहुल यांना शुद्ध आली आहे. जीभ छाचली गेल्यानंतर राहुल कोमामध्ये गेले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करत त्यांच्यावर उपचार केले. ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. पण, घटनेवरून प्रचाराची पातळी आता दिवसेंदिवस घसरत असून जीव घेणे हल्ले करणाऱ्यांना कठोर शासन करा अशी मागणी लोकांकडून होताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -