घरदेश-विदेशकोरोनानंतर भारतात 'या' आजाराची दहशत; ८ वर्षांच्या मुलामध्ये आढळली लक्षणं!

कोरोनानंतर भारतात ‘या’ आजाराची दहशत; ८ वर्षांच्या मुलामध्ये आढळली लक्षणं!

Subscribe

चेन्नईमध्ये या नव्या आजारीची लक्षण लहान मुलांमध्ये आढळून येत असल्याचे पहायला मिळाले

कोरोना महामारीचे संकट जगभरासह देशात असताना आता नवीन आजार भारतात एन्ट्री करताना दिसतोय. सध्या चेन्नईमध्ये या नव्या आजाराची लक्षण लहान मुलांमध्ये आढळून येत असल्याचे पहायला मिळाले आहे. कोरोना व्हायरसशी संबंधित हायपर-इंफ्लेमेटरी सिंड्रोममुळे पीडित झालेल्या चेन्नईमधील आठ वर्षांच्या मुलाची भारतातील पहिली घटना ठरली आहे. या सिंड्रोममुळे महत्वाच्या अवयवांसह संपूर्ण शरीरात सूज येते, जी शरीराच्या अनेक महत्त्वपूर्ण अवयवांना प्रभावित करते आणि नंतर हा आजार जीवघेणा ठरतो.

चेन्नईमध्ये कोरोना बाधित मुलाला गंभीर अवस्थेत कांची कामकोटी चाईल्ड ट्रस्ट हॉस्पिटल येथे नेण्यात आलं होतं, त्यानंतर या मुलाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. या ८ वर्षीय मुलामध्ये विषारी शॉक सिंड्रोम आणि कावासाकी रोगाची लक्षणं आढळून आली. या मुलाच्या प्राथमिक तपासणीत निमोनिया, कोरोना व्हायरस पेनुमोनिटिस, कावासाकी रोग आणि विषारी शॉक सिंड्रोमची लक्षणं दिसून आली. दरम्यान, कोरोनासह मुलामध्ये आढळलेल्या हायपर-इंफ्लेमेटरी सिंड्रोमला काही औषधांच्या मदतीने बरे करण्यात आले आहे, असे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

हा नव्या आजाराचे नाव कावासाकी असून हा आजार जगभरात दिसून येत आहे. एप्रिलच्या मध्यभागी या आजाराची लक्षणं लंडनमध्ये आढळली असून दहा दिवसांत आठ मुलांना हा आजार झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपुर्वी अमेरिकेतल्या बर्‍याच मुलांमध्ये या आजाराची लक्षणं दिसून आली आहे.


लहान मुलांच्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज; कोरोनाचं नवं लक्षण असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा

असा आहे हा आजार

कावासाकी आजाराप्रमाणे हा आजार असल्याचा विश्वास काही डॉक्टरांचा आहे. पाच वर्षांखालील मुलांना कावासाकी आजार होतो. या आजाराला म्यूकोकुटनेस लिम्फ नोड सिंड्रोम (Mucocutaneous Lymph Node Syndrome) देखील म्हणतात.

- Advertisement -

या आजाराची लक्षणं

या आजारामध्ये मुलांना सतत ताप येणं. डोळे लाल होणं. घसा आणि जबडाभोवती सूज येणं, हृदयाचे स्नायू व्यवस्थित काम न करणं, ओठ फाटणं, लाल त्वचेवर पुरळ येणं, सांधेदुखी, हात पाय आणि बोटांना सूज येणं आणि डायरिया असे या आजाराची लक्षणं दिसून येतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -