धक्कादायक : स्विगीवरुन मागवलेल्या जेवणात सापडले रक्त लागलेले बँडेज

स्विगीनेही आपल्या अॅपच्या माध्यमातून अन्नसेवा पुरविणाऱ्या रेस्टॉरंटची निवड करताना, योग्य ती काळजी आणि खात्री करणे, आवश्यक असल्याचं बालामुरगन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

chennai
ordered Chicken noodles through swiggy
स्विगीवरुन मागवलेले चिकन नूडल्स

स्विगीवरुन ऑर्डर करत असाल तर थोडे सावधान रहा. याआधी देखील ऑनलाईन ऑर्डर केलेल्या जेवणात धक्कादायक गोष्टी आढळल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा ग्राहकांच्या आरोग्याच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण स्विगीवरून ऑर्डर केलेल्या चिकन नूडल्समध्ये रक्ताने माकलेले बँडेज सापडले आहे. हा धक्कादायक प्रकार तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये घडला आहे. चेन्नईतील बालामुरगन यांनी रविवारी स्विगी अ‍ॅपच्या माध्यमातून एका हॉटेलमधून चिकन नूडल्स मागविले होते. फूड सर्व्हीस कंपनी स्विगीने ही ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोहचवली. बालामुरगन यांनी हे जेवण खायला सुरुवात केली. मात्र, निम्मं जेवण झाल्यानंतर या जेवणात रक्ताने माकलेले बँडेड आढळल्याने त्यांना धक्का बसला. या घटनेमुळे चेन्नई शहरामध्ये खळबळ उडाली आहे.

ऑनलाईन मागवलेल्या जेवणामध्ये रक्त लागलेले बँडेज आढल्यामुळे संतापलेल्या बालामुरगन यांनी थेट ज्या हॉटेलमधून हे जेवण मागवले होते तेथे धाव घेतली. मात्र हॉटेलवाल्यांनी मदत करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी स्विगीच्या कस्टमर केअरशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी देखील काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर बालामुरगन यांनी सोशल मीडियावर घडलेला प्रकार टाकला. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर याविषयीची माहिती दिली. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर घडलेला सर्व प्रसंग लिहिला आणि स्विगिवरुन मागवलेल्या चिकन नूडल्सचा फोटो टाकला. त्यांची पोस्ट त्यांनी स्विगीच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर देखील पोस्ट केली.

balamurugan deenadayalan facebook post

दरम्यान, स्विगी आणि संबंधित हॉटेलमध्ये ग्राहकांच्या जेवणाची किती काळजी घेतली जाते, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला जात आहे. तसेच, जेवण बनवणारे आचारी हँडग्लोज वापरतात का, स्विगीचे कर्मचारीही तशी काळजी घेतात का, असा प्रश्नही या फेसबुक पोस्टमध्ये बालामुरगन यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, त्यांनी स्विगी अ‍ॅप वापरणाऱ्यांनी याबाबत काळजी घेणं आवश्यक असल्याचे सांगितले आहे. तर संबंधित रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांनीही ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाबाबत सतर्क असावे. तसेच स्विगीनेही आपल्या अॅपच्या माध्यमातून अन्नसेवा पुरविणाऱ्या रेस्टॉरंटची निवड करताना, योग्य ती काळजी आणि खात्री करणे, आवश्यक असल्याचं बालामुरगन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी अद्याप स्विगीकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. फक्त investigate and get back to me in a day or two असा मेसेज स्विगीने दिला असल्याचे बालामुरगन यांनी सांगितले.