छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे नाहीत; लेखकाची ताठर भूमिका

New Delhi
jay bhagwan goyal statement
'आज के शिवाजी' पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांची ताठर भूमिका

भाजपचे नेते आणि ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ लेखक जयभगवान गोयल यांच्यावर देशभरातून टीका होत असतानाही त्यांनी आपली ताठर भूमिका सोडलेली नाही. वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याबाबत त्यांना विचारले असता, हे पुस्तक मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच “मी शिवाजी महाराजांचा मराठी माणसापेक्षाही जास्त आदर करतो. शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाहीत, ते संपुर्ण देशाचे आहेत. त्यामुळे मराठी माणसानेच त्यावर हक्क गाजवू नये. शिवाजी महाराज हे फक्त मराठ्यांसाठी नाही तर मुघलांच्या विरोधासाठी लढले”, असे वक्तव्य जयभगवान गोयल यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

म्हणून मी मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना केली

“माझे पुस्तक वाचल्यानंतर जर कुणाच्या भावना दुखावल्या तर मी पुस्तकाचे पुर्नलेखन करेल. मात्र या पुस्तकाच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना दुखवायच्या नाहीत. मात्र ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी मुठभर लोकांना हाताशी धरून मुघलांशी लढले. त्याप्रमाणे नरेंद्र मोदी देखील पाकिस्तानला धडा शिकवत आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात माता-भगिनी स्वतःला सुरक्षित समजत होत्या. त्याप्रमाणे मोदींच्या काळात आज महिला सुरक्षित आहेत. विविध योजना आखून मोदींनी देशाला प्रगतीपथावर नेले आहे”, असे सांगत गोयल यांनी आपली बाजू मांडली आहे.

काय म्हणाले जयभगवान गोयल

संजय राऊत म्हणतात की, मी शिवाजी महाराजांचा अपमान केला. मात्र खरा अपमान शिवसेनेने केला आहे. स्व. बाळासाहेबांचे हिंदुत्व शिवसेनेने काँग्रेसच्या मांडीवर नेऊन बसवले. जेएनयूमध्ये देशद्रोही लोक देशाविरोधात घोषणाबाजी करत आहेत. त्यांचे समर्थन करण्याचे काम संजय राऊत करत आहेत.

तुलना तर देवाशीही केली जाते. काँग्रेसने तर सोनिया गांधी यांची तुलना दुर्गा मातेशी केली होती. भारतात लोकशाही आहे कुणी कुणाशीही तुलना करु शकते. फक्त हे करताना कुणाचाही अनादर करता कामा नये, मी शिवाजी महाराजांचा अनादर केलेला नाही.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here