घरदेश-विदेशयोगी सरकारची घोषणा; आग्र्यातील संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

योगी सरकारची घोषणा; आग्र्यातील संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

Subscribe

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज, सोमवारी आग्र्यातील मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा केली. आग्र्यामध्ये मुघल संग्रहालयाचे बांधकाम सुरू आहे. या संग्रहालयाचे नाव बदलण्यात येत असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. आग्रामधील संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव देण्यात आले आहे, अशी घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली. ऐतिहासिक ताजमहालच्या पूर्वेकडील द्वारावर बांधण्यात हे संग्रहालय बांधण्यात येत आहे. सुमारे दीडशे कोटींचा हा प्रकल्प आहे.

- Advertisement -

काय म्हणाले आदित्यनाथ

उत्तर प्रदेश सरकार हे स्वराज्याच्या विचारांनी प्रेरीत आहे. गुलामीच्या मानसिकतेचे प्रतीक असलेली चिन्ह सोडून देशाचा गौरव वाढवणाऱ्या विषयांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आपले नायक मुघल असू शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले नायक आहेत, असे त्यांनी ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यूपी सरकारच्या पर्यटन विभागाला याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव जितेंद्रकुमार यांना याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आग्रामध्ये बांधल्या जाणाऱ्या या संग्रहालयात मुघल वस्तू आणि कागदपत्रे प्रदर्शनासाठी मांडण्यात येतील. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाशी संबंधित गोष्टीही या संग्रहालयाचा भाग असतील, असे उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा –

कांदा महागला; केंद्र सरकारने आणली सर्व प्रकारच्या निर्यातीवर बंदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -