छत्तीसगडमधील चकमकीत दहा नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडणधील बीजापूर येथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु झाली असून या चकमकीत दहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

Chhattisgarh
encounter with security forces in Rajpora
छत्तीसगडमध्ये चकमक

छत्तीसगडमधील बीजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सकाळी चकमक सुरु झाली. या चकमकीत दहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. एसपी मोहित गर्ग यांच्या नेतृत्वाखाली स्पेशल टास्क फोर्स आणि डिस्ट्रीक्ट रिझर्व गार्डसच्या जवानांनी ही कामगिरी बजावली आहे.

सुरक्षा दलांनीही दिले चोख प्रत्युत्तर

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडणधील बीजापूर येथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु झाली. शोधमोहीम सुरु असताना नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला असून सुरक्षा दलांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. या चकमकीत एकूण दहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. झारखंडमधील सिंहभूम जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी चकमक झाली होची. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.