घरदेश-विदेशछत्तीसगड निवडणुकीत दुपारपर्यंत २५.१५ टक्के मतदान

छत्तीसगड निवडणुकीत दुपारपर्यंत २५.१५ टक्के मतदान

Subscribe

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत असून दुपारी एक वाजेपर्यंत २५.१५ टक्के मतदान झाले आहे.

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सोमवार, १२ नोव्हेंबर रोजी मतदान होत असून दुपारी एक वाजेपर्यंत २५.१५ टक्के मतदान झाले आहे. येथील विधानसभेच्या १८ जागांसाठी मतदान होत असून आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. दंतेवाडा येथे शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मात्र सकाळी नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दंतेवाडा येथील कटेकल्याण ब्लॉकमधील तुमाकपल कॅम्प येथे आयईडी (इम्प्रोव्हाईजड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) स्फोट झाला. नक्षलवाद्यांनी २ किलो वजनाचा आयईडी येथे पेरला होता.

- Advertisement -

पहाटे साडेपाचच्या सुमारास तुमाकपल-नयनार रस्त्यावर हा स्फोट झाला. सुरक्षा दल आणि मतदान अधिकारी सुरक्षित आहेत. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मतदान अधिकारी बुथ क्रमांक १८३ वर सुरक्षितरित्या पोहोचल्याचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक देवनाथ यांनी सांगितले.

वाचा : आज छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान

- Advertisement -

पहिल्या टप्प्यात १० विधानसभा मतदारसंघांत मतदान

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात १० विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. तर राजनंदगाव येथील पाच मतदारसंघात आणि बस्तर येथील ३ मतदारसंघांमध्ये सकाळी ८ ते ५ यावेळेत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

वाचा : छत्तीसगडमध्ये १०० वर्षाच्या आजीचं मतदान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -