घरदेश-विदेशपी. चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच; कधीही होऊ शकते अटक

पी. चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच; कधीही होऊ शकते अटक

Subscribe

आएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना कधीही अटक होऊ शकते. सुप्रीम कोर्टानेही तूर्तास पी. चिदंबरम यांना दिलासा दिलेला नाही.

आएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना कधीही अटक होऊ शकते. दिल्ली हायकोर्टाने पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन रद्द केल्यानंतर सीबीआयची पथके त्यांच्या घरावर घिरट्या घालत आहेत. त्यातच आज, बुधवारी सुप्रीम कोर्टानेही तूर्तास पी. चिदंबरम यांना दिलासा दिलेला नाही. सुप्रीम कोर्टाने दिल्ली हाय कोर्टाच्या अटकपूर्व जामीन रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

- Advertisement -

पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ति याच्याशी संबंधित ‘आयएनएक्स मीडिया कंपनी’त विदेशी गुंतवणुकीस परवानगी देताना झालेल्या कथित गैरव्यवहारांवरून दाखल खटल्यांमध्ये अटकपूर्व जामिनासाठी काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी केलेल्या याचिका दिल्ली हायकोर्टाने काल फेटाळली होती. त्यानंतर चिदंबरम यांनी तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, त्यांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळालेला नाही. दिल्ली हाय कोर्टाने फेटाळलेल्या चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामिनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. तसेच या प्रकरणाची सुनावणी करत असलेल्या न्यायमूर्ती एन. व्ही. रामना यांनी हे प्रकरण निर्णयासाठी सरन्यायाधीशांकडे वर्ग केले आहे. त्यामुळे आता चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर आज दुपारी सरन्यायाधीश निर्णय देतील.

- Advertisement -

दरम्यान, ईडीने देखील पी. चिदंबरम यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. काल जामिन अर्ज फेटाळल्यानंतर सीबीआयने चिदंबरम यांच्या घराकडे धाव घेतली. तेव्हापासून चिदंबरम गायब आहेत.

विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून बेकायदेशीरपणे मंजुरी मिळवून देण्यासाठी आयएनएक्स मीडियाकडून ३०५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप पी. चिदंबरम यांच्यावर आहे. २००७ वर्षी पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना हे प्रकरण उघडकीस आले होते. यापूर्वी या प्रकरणात चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना सीबीआय आणि ईडीने अटक केली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -