घरदेश-विदेशलैंगिक छळाचे आरोप सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी फेटाळले

लैंगिक छळाचे आरोप सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी फेटाळले

Subscribe

भारतीय सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर एका महिलेनी लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचे आरोप कले आहेत. आज याप्रकरणी तात्काळ सुनावणी बोलवण्यात आली आहे. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती यांनी न्यायपालिका धोक्यात असल्याचे वक्तव्य केले आहे. तसेच त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

भारताचे ४६ वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी २०१८ मध्ये भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. याच सरन्यायाधीशांवर एका महिलेने आपले लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचे आरोप केले आहेत. या महिलेनी सर्वोच्च न्यायालयातील २२ न्यायाधीशांना आरोपा संबंधीत सविस्तर पत्र लिहिले आहे. दरम्यान, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्या आरोपा विरुद्ध उत्तर दिले आहे. त्या महिलेनी केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले आहे. २० वर्षा केलेल्या सेवेचा हे बक्षीस मला मिळते आहे, असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे. तसेच न्यायपालिका धोक्यात आली आहे. तसेच त्या महिलेच्या पाठिशी शक्तीशाली लोकांचा हात आहे, असेही सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले आहे.

सुनावणी दरम्यान गोगोई झाले भावुक

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर सुप्रीम कोर्टात एक ३५ वर्षीय महिलेनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. ही महिला सुप्रीम कोर्टामध्ये ज्यूनियर कोर्ट असिस्टंट होती. या महिलेच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत शनिवार २० एप्रिलला सकाळी तातडीची सुनावणी बोलवण्यात आली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. अरुण मिश्रा आणि संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी केली जात आहे. यावेळी सरन्यायाधीश रंजन म्हणाले की, माझ्या बँकेत फक्त ६ लाख ८० हजार रूपये जमा आहेत. तसेच पीएफमध्ये ४० लाख रूपये आहेत. काही व्यक्तींना माझ्याकडून काही मिळत नसल्याने त्यांनी या महिलेचा आधार घेत माझ्यावर आरोप करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सरन्यायाधीश यांनी प्रसार माध्यमांनाही संयन बाळगावा, असे आवाहनही केले आहे. महिलेनी केलेल्या आरोपाची शहानिशा करा नंतरच त्यासंबंधीत बातम्या प्रसिद्ध करा, अशामुळे न्यायमंडळाचे स्वातंत्र धोक्यात येऊ शकते असे त्यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

महिलेने केलेले आरोप हे बिनबुडाचे?

दरम्यान, सरन्यायाधीशावर लैंगिक छळ केल्याचे जे आरोप केले आहेत, ते आरोप फक्त बदनामी करण्यारे आणि बिनबुडाचे आहेत. तसेच या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. या महिलेने अनेक न्यायाधीशांना आरोप पत्र पाठवले असल्याचे, सुप्रीम कोर्टाचे महासचिव संजीव सुधाकर कलगावकर यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -