घरदेश-विदेशशरीरातील घामावरुन श्वान शोधणार कोरोना रूग्ण; श्वानांना दिलं जातंय प्रशिक्षण

शरीरातील घामावरुन श्वान शोधणार कोरोना रूग्ण; श्वानांना दिलं जातंय प्रशिक्षण

Subscribe

कोरोनाची लागण होण्याच्या सुरूवातीच्या स्टेटमध्ये असणाऱ्या माणसाच्या शरीरातील घामामधून कोरोनाचे निदान करण्यासाठी चिलीमध्ये श्वानांना प्रशिक्षण दिले जात आहे.

कोरोना व्हायरसचा कहर सुरू असताना जगभरासह देशात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. झपाट्याने वाढ होणाऱ्या रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोरोना जास्तीत चाचण्या हा एकच पर्याय सध्या आहे. एखाद्याला कोरोनाची लागण झाली असल्यास, त्याचे निदान लवकरात लवकर व्हावे, यासाठी जगात वेगवेगळया टेक्निक विकसित केल्या जात आहेत. श्वानांना प्रशिक्षण देणे हा सुद्धा त्याच टेक्निकचा एक भाग असल्याचे नुकतेच समोर आले आहे.

चिलीमध्ये श्वानांचे प्रशिक्षण

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाची लागण होण्याच्या सुरूवातीच्या स्टेटमध्ये असणाऱ्या माणसाच्या शरीरातील घामामधून कोरोनाचे निदान करण्यासाठी चिलीमध्ये श्वानांना प्रशिक्षण दिले जात आहे. यूकेमध्ये अशाच प्रयोगाचे निष्कर्ष समोर आले आहेत. चिलीमध्ये लॅब्राडोर आणि गोल्डन रिट्राईव्हर्स प्रकारातील चार श्वानांना प्राथमिक प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले आहे. राजधानी सँटिगो येथील कॅराबिनीरो स्पेशलिस्ट ट्रेनिंग बेस येथे त्यांचे प्रशिक्षण सुरु आहे.

- Advertisement -

अनेक आजारांचे रूग्ण शोधण्यास श्वानांची मदत

लॅब्राडोर आणि गोल्डन रिट्राईव्हर्स प्रकारातील श्वान ड्रग्स, स्फोटके आणि माणसांना शोधून काढण्यासाठी ओळखले जातात. त्याशिवाय यापूर्वी मलेरिया, कॅन्सर आणि पार्किसन्सचे रुग्ण शोधून काढण्यासाठीही श्वानांना प्रशिक्षित करण्यात आले होते, असे देखील सांगितले जात आहे.

हुंगण्याच्या क्षमतेने श्वान शोधणार कोरोना रूग्णांना..

श्वानामध्ये ३० लाखापेक्षा जास्त घाणेंद्रिये असून ते प्रमाण माणसापेक्षा ५० पट जास्त आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस विरुद्ध लढयात श्वानाची मदत होऊ शकते, असे पोलीस स्पेशलिटी ट्रेनिंग स्कूलचे संचालक लेफ्टनंट कर्नल क्रिस्टियन यानेझ यांनी सांगितले आहे. चिलीमध्ये शाळा, बस डेपो आणि विमानतळ आणि अन्य वर्दळीच्या ठिकाणी श्नांना ठेवण्याची योजना आहे. आपल्या हुंगण्याच्या क्षमतेने श्वान सुरुवातीच्या स्टेजमध्ये असतानाच करोना रुग्णाला शोधून काढतील, तेव्हा हे श्वान महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे देखील ते म्हणाले.


कंगनाच्या मनालीतील घरावर गोळीबार; म्हणाली, ‘मला घाबरवण्याचा होतोय प्रयत्न’!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -