घरदेश-विदेशचीनमध्ये प्रवासी आणि चालकाच्या वादात बस नदीत कोसळली

चीनमध्ये प्रवासी आणि चालकाच्या वादात बस नदीत कोसळली

Subscribe

हिला प्रवास आणि चालक यांच्या भांडणात बसवरील ताबा सुटून रेलिंग तोडून बस नदीत पडली. पोलिसांनी बसमधील १३ प्रवाशांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले आहे, तर दोन मृतदेह अद्यापही सापडले नसून त्यांचा शोध सुरु आहे.

चीनमध्ये प्रवासी बस यांगत्से नदीमध्ये कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये १५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. महिला प्रवासी आणि चालकांमध्ये वाद झाल्यामुळे ही घटना घडली आहे. चीनमध्ये रविवारी हा अपघात झाला असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बसमध्ये असलेली प्रवासी महिला आणि चालकामध्ये काही कारणास्तव वाद झाला. संतप्त झालेली महिला काही तरी वस्तूने चालकाच्या डोक्यावर प्रहार करतेय. स्वत:चा बचाव करण्यासाठी हा चालक त्या महिलेला ढकलताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. स्वत:ला बचावण्याचा प्रयत्न करताना गाडीचालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रेलिंग तोडून थेट नदीमध्ये कोसळली.

- Advertisement -

१३ मृतदेह बाहेर काढले

ही घटना चीनमधल्या दक्षिण पश्चिम चॉगकांग शहरातील यांगस्ते नदीच्या पुलावर घडली आहे. महिला प्रवास आणि चालक यांच्या भांडणात बसवरील ताबा सुटून रेलिंग तोडून बस नदीत पडली. पोलिसांनी बसमधील १३ प्रवाशांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले आहे, तर दोन मृतदेह अद्यापही सापडले नसून त्यांचा शोध सुरु आहे.

दोघांच्या वादात १५ जणांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ४८ वर्षीय महिला प्रवाशीचा स्टॉप पाठी राहिल्यानं तिनं बसचालकाकडे बस थांबवण्याचा तगादा लावला होता. परंतु चालकाने बस थांबवण्यास नकार दिला. चालकानं मध्येच बस थांबवून तिला उतरवण्यास विरोध केल्यानं तिने रागाच्या भरात चालकाला एका वस्तूने मारण्यास सुरुवात केली. या वादा दरम्यान बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस नदीत पडून ही मोठी दुर्घटना घडली. दोघांच्या वादात निष्पाप प्रवाशांचा बळी गेला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -