घरCORONA UPDATEअमेरिका व जपानमध्ये करोना पसरताच चीनमध्ये जल्लोष

अमेरिका व जपानमध्ये करोना पसरताच चीनमध्ये जल्लोष

Subscribe

अमेरिका व चीनमध्ये करोनावरून रोज आरोप प्रत्यारोप होत आहेत. याचे आता विकृतीमध्ये रुपांतर झाल्याचे चीनमध्ये पाहायला मिळाले. येथील एका रेस्ट़ॉरंटबाहेर अमेरिकेत व जपानमध्ये करोनाचा फैलाव झाल्याबद्दल आनंद व्यक्त करणारे पोस्टर्स लावण्यात आले. या पोस्टर्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच जगभरातून चीनवर व चीनी नागरिकांच्या मानसिकतेवर टीका होत आहे. त्यानंतर या रेस्टॉरंटची फ्रॅंचाईझी चालवणाऱ्या मालकाला कंपनीने कामावरून काढले.

डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार महामारी पसरवल्याबदद्ल अमेरिकेचे अभिनंदन, छोट्याशा जपानमध्येही ही महामारी दिर्घकाळ सुरू राहू दे असे लिहण्यात आले होते. हे पोस्टर्स वाचून अमेरिका व जपानविरोधी चीनी नागरिकांना आनंद होईल असा त्यामागचा हेतू असल्याची कबुली मालकाने दिली. विशेष म्हणजे हे पोस्टर्स बघून आनंद साजरा करण्यासाठी अनेकांनी या रेस्टॉरंटमध्ये गर्दीही केली होती. एकीकडे अमेरिका व जपानबरोबरच अनेक देशांमध्ये करोनाने मृत्यूचे थैमान घातले आहे. यामुळे जगभरात गंभीर परिस्थिती उद्भवलेली असताना चीनमध्ये दाखण्यात आलेल्या या विकृतपणावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. या कृत्यावरून चीनी नागरिकांची संकुचित मानसिकता कळते असेही काहीजणांनी म्हटले आहे.

- Advertisement -

तर जगात महासत्ता असलेल्या अमेरिकेवर चीनकडून कायम कुरघोडी करण्याचा प्रयत्न होत असतो. तसेच दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान चीन व जपानचे संबंधही बिघ़डले होते. त्यामुळे चीन नेहमीच जपानला लक्ष्य करण्याची संधी शोधत असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -