घरदेश-विदेशचीनची खोडकर मुलगी चक्क स्कॅनिंग मशीनमध्ये शिरली

चीनची खोडकर मुलगी चक्क स्कॅनिंग मशीनमध्ये शिरली

Subscribe

चीनमध्ये एक लहान मुलगी लाईनमध्ये उभं न राहता थेट स्कॅनिंगमशीनमध्ये शिरली आहे. तिचा स्कॅनिंग मशीनमध्ये शिरण्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

प्रत्येक रेल्वे स्थानकावर स्कॅनिंग मशीन असतं. हे मशीन प्रवाशांच्या बॅगा तपासतं. सुरक्षेच्या दृष्टीकोनाने हे मशीन फार महत्त्वाचं आहे. या मशीनमध्ये बॅग टाकल्यावर स्टेशनच्या आतमध्ये गेल्यावर ती त्या स्कॅनिंगमशीनमधून बाहेर येते. मात्र, सोमवारी चीनच्या शेडोंग प्रांतातील दमिंगू रेल्वे स्थानकावर एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला आहे. या स्थानकावर बॅगा तपासणारी स्कॅनिंग मशीन ज्याला एक्स-रे मशीनही म्हणतात, त्या मशीनमध्ये एक लहान मुलगी शिरली. तिचा एक्स-रेमध्ये शिरण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या मुलीचा एक्स-रे मशीनचा स्क्रिन फोटोही प्रचंड व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

सध्या सोशल मीडियामध्ये या मुलीची स्कॅनिंग मशीनमध्ये शिरण्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये ही लहान मुलगी लाईनमध्ये उभे राहण्याऐवजी स्कॅनिंग मशीनमध्ये शिरली आणि त्या मशीनमधून बाहेर पडली. या मुलीचे वडील आणि सुरक्षा अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. परंतु, त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही मुलगी मशीनमध्ये शिरली. या मशीनमध्ये शिरल्यामुळे या मुलीचा मृत्यूही झाला असता. त्यामुळे स्कॅनिंग मशीनमध्ये शिरणं चुकीचं असल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे चीनच्या प्रसारमाध्यमांनी या सुरक्षा रक्षकांना धारेवर धरले आहे. त्याचबरोबर अशाप्रकारचा प्रयोग कुणी करु नये आणि आपल्या मुलांना यापासून लांब ठेवण्याचा सल्ला चीनी प्रसारमाध्यमांकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -