घरदेश-विदेशचीनच्या कुरघोडी सुरुच,अरूणाचलच्या सीमाभागात वसवले गाव

चीनच्या कुरघोडी सुरुच,अरूणाचलच्या सीमाभागात वसवले गाव

Subscribe

गावात एकूण १०१ घरे असल्याचे दिसून येत आहे.

गेली अनेक वर्षे सुरू असलेला भारत चीन सीमावाद हा चर्चेचा विषय ठरला आहे. चीन नेहमी सीमाभागात घुसखोरी करून सीमेवरील तणाव वाढण्याचा प्रयत्न करत असते. त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अरूणाचल प्रदेषशातील भारताच्या हद्दीत चीनने घुसखोरी करून एक गाव वसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. एनडिटिव्हीने याबाबत वृत्त प्रसारित केले आहे. एका सॅटेलाईट फोटोद्वारे या गावाचे फोटो समोर आले आहेत. सुबनशिरी जिल्ह्यातील त्सारी चू नदीच्या किनाऱ्याजवळ चीनने हे गाव वसवले आहे. या गावात एकूण १०१ घरे असल्याचे दिसून येत आहे. १ नोव्हेंबर २०२० ला हे सॅटेलाईट फोटो काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तज्ज्ञांनीही या फोटोला दुजोरा दिला आहे.

भारताच्या प्रत्यक्ष सीमेपासून सुमारे साडे चार किलोमीटर हे गाव वसले असल्याचा दावा करण्यात आला आहे. चीन सातत्याने भारताच्या सीमाभागात घुसखोरी करत असते. अरूणाचल प्रदेशातील भारताच्या सीमाभागात चीनने वसवलेल्या गावामुळे आता भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे. या भागाला सशस्र लढाईची जागा म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी भारत आणि चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीदरम्यान चीनने हे गाव वसवले आहे असे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

या आधीही चीनने भूतानच्या हद्दीत एक गाव वसवल्याचे समोर आले होते. चीनची सतत आक्रमक भुमिका ही भारतासाठी अतिशय चिंताजनक आहे. काही दिवसांपूर्वी चीनी सैन्याने भारताच्या सीमाभागात खुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. चुकून भारताच्या सीमाभागात आल्याचा दावा त्या चीनी सैन्याने केला होता. घुसखोरी करणाऱ्या चीनी सैन्याला भारताने ताब्यात घेऊन त्याला नंतर चीनकडे सोपवण्यात आल होते.


हेही वाचा – दिल्ली उच्च न्यायालय म्हणतंय, Privacy भंग होतेय, तर WhatsApp डिलीट करा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -