घरदेश-विदेशचीनची भारताला पोकळ धमकी; म्हणाले, तिबेट विषयात लक्ष देऊ नका

चीनची भारताला पोकळ धमकी; म्हणाले, तिबेट विषयात लक्ष देऊ नका

Subscribe

चीनमधील कम्युनिटी पार्टीशी संबंधीत असलेल्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रातून पुन्हा एकदा भारतावर कुरहोडी केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यामध्ये चीनच्या सरकारने त्यांच्या मुखपत्रातून तिबेट विषयावर भाष्य केले आहे. भारताला आता तिबेट कार्ड वापरण्याची गरज असल्याने देशातील काही माध्यमांमध्ये चर्चा होत असल्याचे त्यांनी संपादकीयमध्ये म्हटले आहे. हा विषयांतर करणारा आणि वायफळ असा विचार आहे, अशी टीका त्यांनी मुखपत्रातून केली आहे.

प्रस्ताविक तिबेट कार्ड भारतीय इकोनॉमीसाठी तोट्याचे या शीर्षकाखाली हा लेख वृत्तपत्रामध्ये छापून आला आहे. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, भारताचे चीनसोबत सुरू असलेल्या तणावपूर्ण वातावरणाता तिबेटचा मुद्दा भारतासाठी फायदेशीर ठरू शकतो. मात्र हा त्यांचा चुकीचा समज आहे. तिबेट हा चीनचा वैयक्तीक प्रश्न आहे आणि या मुद्द्याला हात घालण्याची गरज नाही.

- Advertisement -

तिबेट हे आशिया खंडातील हिमालय पर्वताच्या उत्तरेकडील एक पठार असून समुद्रसपाटीपासून सरासरी १६ हजार फूट उंच असलेले हे जगातील सर्वात उंच पठार आहे. त्यामुळे त्याला जगाचे छप्पर असे सुद्धा म्हणतात. ७ व्या शतकापासून इतिहास असलेले तिबेट आजवर एक साम्राज्य, स्वायत्त देश व चीन देशाचा प्रांत इत्यादी अनेक स्वरूपांमध्ये अस्तित्वात राहिलेले आहे. सध्या तिबेट या नावाने ओळखला जाणारा बराचसा प्रदेश चीनच्या अंमलाखाली (तिबेट स्वायत्त प्रदेश) आहे.

हेही वाचा –

Corona: धक्कादायक! पुण्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये वृद्धाने केली आत्महत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -