घरCORONA UPDATECoronaVirus : भारताच्या शेजारील देशांसोबत चीन आपले संबंध वाढवतोय!

CoronaVirus : भारताच्या शेजारील देशांसोबत चीन आपले संबंध वाढवतोय!

Subscribe

चीनने भारताचे शेजारी देश श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, मालदीव इत्यादी देशांमध्ये बरीच पायाभूत गुंतवणूक केली आहे.

भारत आणि चीन यांच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाला मदत करण्याच्या बहाण्याने चीनकडून भारताच्या तीन शेजारी देशांशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणात चीनपेक्षा बरेच पुढे आहेत. प्रत्यक्षात पंतप्रधान मोदी गेल्या तीन महिन्यांत ४० देशांच्या नेत्यांशी बोलले आहेत. चीन आज जगात एक मोठी शक्ती बनली आहे आणि आता ते मुत्सद्दी स्तरावर संपूर्ण जगात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेषत: दक्षिण आशियाच्या देशांमध्ये चीनचा प्रभाव लक्षणीय वाढला आहे. चीनने भारताचे शेजारी देश श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, मालदीव इत्यादी देशांमध्ये बरीच पायाभूत गुंतवणूक केली आहे. तसेच चीनच्या या रणनीतीचा कट शोधण्याचा प्रयत्न भारत करत आहे.

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल परिषदेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांमधील महत्त्वपूर्ण करारही झाले. ज्याअंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया आता एकमेकांचे सैन्य, हवाई दल, नौदल वापरू शकतील. दोन देशांमधील या करारामुळे आशिया प्रशांत महासागरातील चीनच्या अडचणी वाढू शकतात.

- Advertisement -

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांनी आपल्या रशियनशी बोलणे केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी ११ मार्चपासून ४९ देशांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. दरम्यान, मालदीव, श्रीलंका, मॉरीशस, मेडागास्कर, सिसिली, कोमोरो आयलँड आणि पाकिस्तान यासारख्या हिंद महासागराच्या देशांव्यतिरिक्त भारताने सर्व दक्षिण आशियाई देशांमध्ये औषधे पाठविली आहेत.

मार्चमध्ये पंतप्रधान मोदींनी सार्क देशांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत बैठक घेतली. २३ मे रोजी त्यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि २५ मे रोजी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी संवाद साधला. एप्रिलमध्ये पंतप्रधान मोदींनी नेपाळचे पंतप्रधान केपी ओली आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांच्याशीही बोललो.

- Advertisement -

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंका या तीन भारतीय शेजारी देशांच्या प्रमुखांशी चर्चा केली आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, कोरोना महामारीच्यावेळी चिनी राष्ट्रपतींनी या देशांच्या नेत्यांशी एकता दर्शविली आहे आणि म्हटले आहे की या देशांमध्ये होत असलेल्या विकासकामांचे काम लवकरच पुन्हा सुरू करावे.

नेपाळमधील चिनी राजदूत हौ यांगी यांनी नेपाळचे पंतप्रधान केपी ओली आणि नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या इतर दोन नेत्यांशी चर्चा केली. २१ मे रोजी चीन आणि पाकिस्तानशी द्विपक्षीय संबंधाला ६९ वर्ष पूर्ण झाले. दरम्यान, पाकिस्तानमधील चीनचे राजदूत याओ जिंग यांनी ट्विट केले की दोन्ही देशांमधील मजबूत संबंध आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -