घरदेश-विदेशचीनी Apps बंदीवर चीनने घेतला आक्षेप; भारताने दिलं भन्नाट उत्तर

चीनी Apps बंदीवर चीनने घेतला आक्षेप; भारताने दिलं भन्नाट उत्तर

Subscribe

भारताने ही कारवाई सुरक्षेच्या कारणांवरून केल्याचे चीनला केले स्पष्ट

लडाख प्रदेशातील नियंत्रण रेषेवरील चिनी सैन्यांबरोबर सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत चीनी apps बॅन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला असून चीनच्या ५९ apps वर बंदी घातली दरम्यान लडाखमधील ताण-तणाव वाढल्यानंतर भारताने चीनला आर्थिक फटका देण्यासाठी ५९ apps वर बंदी घातली. या ५९ apps वर बंदी घातल्याने चीनला मोठा धक्का बसून त्यांची आर्थिक गणितं कोलमडून मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

भारताने चीनला मोठा झटका दिल्यानंतर अखेर चीनने गलवान खोऱ्यातून माघार घेतली. मात्र भारत देत असलेल्या धक्क्याने चीनचे नाकीनऊ आले आहेत. मंगळवारी भारत आणि चीनमध्ये राजदूत स्तरावर झालेल्या चर्चेत चीनने या apps वरील बंदीबद्दल आक्षेप घेतला. मात्र हा आक्षेप दर्शविल्यानंतर भारताने देखील जशासतसे उत्तर दिले आहे.

- Advertisement -

असे दिले भारताने चीनला उत्तर…

भारताने ही कारवाई सुरक्षेच्या कारणांवरून केल्याचे चीनला स्पष्ट केले. आमच्या नागरिकांच्या तपशीलाशी कोणतीही छेडछाड होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे भारताकडून चीनला सांगण्यात आले. तसेच या झालेल्या बैठकीत चिनी राजदूतांनी apps वरील बंदीचा मुद्दा उपस्थित केला. apps वरील बंदी ते चिनी असल्याने घातलेले नसून त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका असल्याने घातले आहेत, असे जबरदस्त उत्तर भारताकडून चीनला देण्यात आले आहे.

…म्हणून धोका निर्माण होऊ शकतो

चिनी apps चा वापर केल्याने युजर्सच्या वैयक्तिक माहितीला अर्थात प्रायव्हसीला सर्वाधिक धोका असतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या व्यक्तींच्या मोबाईलमध्ये चिनी apps असल्यास देशाची गोपनीय माहिती शत्रूच्या हाती लागू शकते. याशिवाय चिनी apps मुळे सुरक्षेलाही धोका असतो.


WHO नं जगभरातल्या सरकारांना Corona वरून फटकारलं!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -