‘चीनी व्हायरस’ टीकेवर चीननं दिलं प्रत्युत्तर!

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसची सुरुवात चीनमधूनच झाली. याचा कोणताही सिद्ध पुरावा नाही..त्यामुळे याला चायनीज किंवा वुहान व्हायरस म्हणणं चूक आहे असं म्हणत चीनने त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.

New Delhi
lockdown woman dies due to corona dombivli
कोरोना व्हायरस

करोना व्हायरसचा फैलाव जगभरात होत असताना हा व्हायरस चीननेच वाढवला आणि पसरवला अशी टीका होऊ लागली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील तशी टीका केली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर देखील यासंदर्भातले मेसेज व्हायरल होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर चीनने आपली बाजू मांडताना या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आम्ही करोनाचा व्हायरस तयारही केलेला नाही आणि मुद्दाम ट्रान्सफर देखील केलेला नाही’, अशा शब्दांत चीनने या सर्व आरोपांना उत्तर दिलं आहे. तसेच, ‘करोना व्हायरसला वुहान व्हायरस किंवा चायनीज व्हायरस असं म्हणणं देखील चुकीचं आहे’, असं देखील स्पष्ट केलं आहे. चीनचे भारतातील प्रवक्ते जी राँग यांनी द वायरशी बोलताना ही भूमिका मांडली आहे.

‘करोनाची सुरुवात चीनमध्येच झाली हे सिद्ध नाही’

यासंदर्भात बोलताना राँग म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनी लोकांवर टीका करण्यापेक्षा चीनने या व्हायरसच्या साथीचा कशा प्रकारे सामना केला, त्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं. वुहान शहरात पहिल्यांदा करोनाबाधित रुग्ण आढळला. पण त्यातून असं कुठेही सिद्ध झालेलं नाही की चीनमधूनच या व्हायरसला सुरुवात झालेली आहे. करोना व्हायरसची सुरुवात नक्की कुठून झाली, यावर सविस्तर अभ्यासाअंतीच निर्णय घेता येईल’, असं देखील राँग म्हणाले.

‘चीनने WHO ला सांगितलं होतं’

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेकडून करोना व्हायरसचा उल्लेख वुहान व्हायरस म्हणून केला होता. मात्र, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO नेच जाहीर केल्याप्रमाणे कोणत्याही व्हायरसला एखाद्या देशाशी, प्रदेशाशी किंवा स्थानिक समुहाशी जोडता येणार नाही. अशा प्रकारचा कोणताही प्रयत्न उडवून लावायला हवा. यावर बोलताना राँग म्हणाले, ‘करोना चीनमध्ये पसरायला लागताच चीनने पारदर्शी आणि जबाबदार पद्धतीने कठोर पावलं उचलली. शिवाय, या प्रत्येक घडामोडीची माहिती चीनने WHO ला दिली आहे. उपचार पद्धती आणि सुरक्षेचे उपाय याविषयी देखील चीनने आंतरराष्ट्रीय समुदायाला वेळोवेळी माहिती दिली आहे’, असं देखील राँग म्हणाले.


फेसबुकवर लोड वाढला, पहिल्यांदाच ४५ हजार कर्मचारी वर्क फ्रॉम होम!

चीनमध्ये आत्तापर्यंत ८१ हजार १७१ लोकांना करोनाची लागण झाली आहे. त्यातल्या ७३ हजार १५९ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ४ हजार ७३५ रुग्णांवर अद्याप उपचार सुरू असून ३ हजार २७७ रुग्णांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here