घरCORONA UPDATEबापरे! फ्रोझन चिकनमध्ये कोरोना

बापरे! फ्रोझन चिकनमध्ये कोरोना

Subscribe

कोरोनाचा शिरकाव कुठे कुठे होईल काही सांगता येत नाही. आतापर्यंत मांजर, कुत्रा अशा प्राण्यांमध्ये कोरोनाचे विषणू आढळून आले असल्याचे बोलले जात होते. मात्र आता चक्क फ्रोझन चिकनमध्येही कोरोना आढळून आल्याचे समजते. चीनमधील शिनझेन शहरामधील ग्राहकांनी फ्रोझन फूड म्हणजेच गोठवलेले अन्नपदार्थ घेताना जास्त काळजी घ्यावी, असे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. ब्राझीलमधून आयात करण्यात आलेल्या चिकन विंग्समध्ये कोरोनाचे विषाणू आढळून आल्यानंतर प्रशासनाने एक पत्रक जारी केले आहे.

तेथील नागरिकांनी फ्रोझन फूड खरेदी करताना जास्त काळजी घ्यावी, असे प्रशासनाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. यासंदर्भातील वृत्त ब्लूमबर्गने दिले आहे. शिनझेनमध्ये आयात करण्यात आलेल्या चिकन विंग्समधील मांसाच्या चाचण्यांदरम्यान त्यामध्ये कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. तसेच ब्राझीलमधील सॅण्टा कार्टारिना शहरामधील अरोरा अॅलिमोन्टोज येथील कारखान्यामधून आयात करण्यात आलेल्या मांसांमध्ये कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. या कारखान्याच्या नोंदणी क्रमांकासहीत सर्व माहिती स्थानिक प्रशासनानेच दिली आहे. या प्रोडक्टबरोबर आलेल्या सर्वच पाकिटांमधील मांसाची चाचणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, या आयातीसंदर्भातील सर्व कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. काही दिवसांपूर्वीच चीनच्या पूर्वेकडील यानताई बंदरामध्ये आयत करण्यात आलेल्या मासळीच्या पाकीटांवर कोरोनाचे विषाणू आढळून आले होते. डालियान शहरामधून आलेल्या मासळीच्या पाकिटांवर हे विषाणू आढळून आल्याने स्थानिक प्रशासनाने एक पत्रक जारी केलेल. यामध्ये फ्रोजन फूड प्रकारातील मासळीच्या पाकीटांवर हे विषाणू आढळून आल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले होते.

हेही वाचा –

कोरोना पाठोपाठ मुंबईवर आणखी एक संकट, पालिकेच्या आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -