हेरगिरी करणाऱ्या चीनचं लक्ष आता भारतीय अर्थव्यस्थेवर

तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या उद्योजकांवरही चीनी कंपनीची पाळत

china spying indian economy tech start ups, payment apps,

चीन ‘झेनुआ डाटा’ या कंपनीद्वारे भारताच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच नाही तर, भारताच्या नव्या अर्थव्यवस्थेवरही पाळत ठेवून आहे. या कंपनीने भारतीय नवअर्थव्यवस्थेतील जवळपास सर्व घटकांची, तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या उद्योजकांची आणि ‘पेमेंट App’पासून आरोग्यापर्यंतच्या विविध Appsच्या माहितीचे संकलन केलं आहे. याबाबतचं वृ्त ‘दी इंडियन एक्स्प्रेसने’दिलं आहे.

‘झेनुआ डाटा’ या चिनी माहिती तंत्रज्ञान कंपनीने राजकीय, उद्योगपती तसंच देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंची माहिती गोळा केल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आता भारताच्या नव्या अर्थव्यवस्थेच्या जवळपास सर्व घटकांची, भारतीय रेल्वेत भरती होणाऱ्या अभियांत्रिकीचे विद्यार्थ्यांपासून उद्योगपती अझिम प्रेमजी यांच्या गुंतवणूक कंपनीच्या अधिकाऱ्यापर्यंतची माहिती गोळा केली आहे. याशिवाय, भांडवल पुरवणाऱ्या कंपन्या, महत्त्वाचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या उद्योजक कंपन्या आणि त्यांचे संस्थापक तसंच प्रमुख, इ-कॉमर्स कंपन्या आणि भारतीय वंशाचे परदेशी गुंतवणूकदार, महिंद्रा समूहाचे मुख्य वित्त अधिकारी, रिलायन्स समूहातील वरिष्ठ अधिकारी, फ्लिपकार्ट, झोमॅटो, स्वीगी, नायका, उबर, पे यू आदी कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती संकलित केली आहे.

यांच्यावरही नजर

 • बायजूस, अड्डा २४७, ऑलिव्हबोर्ड
 • लर्निस्ट – या प्लॅटफॉर्मवरुन शिक्षकांना ऑनलाईन वर्ग भरवता येतो.
 • केंझनो – परदेशी शिक्षणासाठीचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म
 • ऑक्सिलो – भारतीय विद्यार्थ्यांसाठी अभ्यास कर्ज देते.
 • देशातील अग्रगण्य पेमेंट Apps पे टीएम, रेझरपे आणि फोन पे

पुरवठा साखळी

 • महिंद्रा लॉजिस्टिक
 • ट्रक्स App – पुरवठा साखळी परिवहन App
 • शॅडोफॅक्स – एक अग्रगण्य क्राऊडसोर्स बी 2 बी मैल वितरण सेवा मंच
 • मोजरो – लॉजिस्टिक सर्व्हिस स्टार्टअप

डीलिव्हरी Apps

 • ऑनलाईन सुपरमार्केट Apps बिगबास्केट आणि डेली बाजार, झॅपफ्रेश आणि फ्रेश मीट मार्केट
 • फूड डिलिव्हरी Apps झोमॅटो, स्विगी आणि फूडपांडा