घरCORONA UPDATEचीनच्या अध्यक्षांना कोरोना? लाईव्ह भाषणात 'गले मे खिच खिच'

चीनच्या अध्यक्षांना कोरोना? लाईव्ह भाषणात ‘गले मे खिच खिच’

Subscribe

संपूर्ण जगाला कोरोनाचा संसर्ग दिल्याची सुरूवात ज्या देशातून झाली असे आरोप होत आहेत, अशा चीनच्या राष्ट्रपतींनाच कोरोनाची लागण झाल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरू असतानाच बुधवारी हाँगकाँगजवळील शेन्जेनमधील एका कार्यक्रमात शी जिनपिंग यांना झालेल्या खोकल्याचा त्रासामुळे ही शंका अजूनच बळावली आहे. अद्याप त्यांच्या खोकल्याचे कारण समोर आले नसले तरी ही कोरोनाची तर लक्षणे नाहीत ना, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात होत आहे.

नेमके काय घडले 

चीनचे राष्ट्रपती शी जिनपींग यांना त्या कार्यक्रमात खोकल्याच्या त्रासामुळे आपले भाषण काही वेळेसाठी थांबवावे लागले. त्यामुळेच जिनपींग यांच्या प्रकृतीची चर्चा सुरू झाली आहे. चीनच्या प्रसारमाध्यमांनी शी जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही वृत्त प्रकाशित केले नाही. चीनची वृत्तवाहिनी सीसीटीव्हीवर जिनपिंग यांच्या भाषणाचे थेट प्रसारण सुरू होते. जिनपिंग यांना खोकल्याचा त्रास होऊ लागल्यानंतर ते खोकत असतानाचे व्हिज्युअल हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ऑडिओमध्ये त्यांच्या खोकण्याचा आवाज सातत्याने येत होता. एका व्हिज्युअलमध्ये शी जिनपिंग आपल्या तोंडावर हात ठेऊन खोकत असल्याचे दिसून आले.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी शी जिनपिंग यांनी शेन्जेनचा दौरा केला होता. यावेळी ते मास्कविना लोकांसोबत संवाद साधत होते. मात्र, त्यांनी योग्य अंतर ठेवले होते. शी जिनपिंग यांनी मास्क घालणे आवश्यक होते, असे म्हणत त्यांच्यावर टीकादेखील करण्यात आली होती.

हेही वाचा –

Breaking : घटस्थापनेच्या मुहूर्तावर मोठा निर्णय; महिलांना लोकलने प्रवासाची मुभा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -