घरदेश-विदेशभारतीय लष्करावर दडपण आणण्याचा चीनींचा प्रयत्न; तिबेटमध्ये गोळीबारीचा सराव सुरू

भारतीय लष्करावर दडपण आणण्याचा चीनींचा प्रयत्न; तिबेटमध्ये गोळीबारीचा सराव सुरू

Subscribe

पूर्व लडाखच्या लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (LAC) वर तणावाच्या वातावरणात चीन मानसिकरित्या भारतीय लष्करावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय सेनेचे मनोबल खच्ची करण्यासाठी चीनच्या सैनिकांनी तिबेट्या परिसरात गोळीबार करण्याचा सराव सुरू केला आहे. चीनच्या सैनिकांनी एलएसी आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात फायरिंग करण्यास सुरूवात केली असून ते गोळीबारीचा सराव करत असल्याचे सांगितले जात आहे. परंतू लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत एलएसीच्या अनेक ठिकाणांवर त्याचा आवाज घुमत आहे. त्यामुळे भारतीय सैनिकांचे मनोबल खच्ची करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना असे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वी पूर्व लडाख भागात LAC च्या जवळ चीनचे शस्त्रधारी सैनिक तैनात असल्याचे आढळून आले होते. LAC म्हणजे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ हे सैन्य तैनात करण्यात आले होते. चिनी सैन्याच्या हातात स्टिक मॅचेट्स नावाचे शस्त्र असून पूर्व लडाख भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ हे सैनिक तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणी सुमारे ४० ते ५० सशस्त्र चिनी सैनिक तैनात करण्यात आले असून त्यांच्या हाती धारदार शस्त्र असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे चीनी सैनिक वारंवार भारतीय लष्करावर कुरहोडी करत असल्याचे गेल्या काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

महापालिकेचे कंगनाकडे लक्ष, हाडे मोडणार्‍या खड्ड्यांकडे दुर्लक्ष!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -