घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटकाय म्हणावं या चीनला; स्वतःच छापले #BocottChina अभियानाचे टी शर्ट

काय म्हणावं या चीनला; स्वतःच छापले #BocottChina अभियानाचे टी शर्ट

Subscribe

कोरोना व्हायरसच्या विळख्यात संबंध जग अडकल्यानंतर चीनच्या विरोधात काही देशांनी नाराजीचा सूर आळवला आहे. अमेरिकेने तर उघड उघड चीनच्या विरोधात भूमिका घेतली आहेच. तर भारत आणि चीनच्या दरम्यान सीमावादाचा प्रश्न उभा राहिला असून दोन्ही देशांनी सीमेवर मोठ्या प्रमाणात फौजफाटा उभा केला आहे. त्यामुळे चीनच्या विरोधात भारतात विरोधाचा सूरम उमटत आहे. मात्र यातही स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेण्याचा प्रयत्न चीनमधील कंपन्या करत आहेत.

चीनने मोठ्या प्रमाणात #BoycottChina टी शर्ट छापायला घेतले आहेत. याआधी चीनने #ILoveChina असे टी शर्ट छापायला घेतले होते. मात्र त्याला अतिशय कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे त्याची छपाई बंद करण्यात आली आहे. आता चीन जगभर #BoycottChina हे टी शर्ट पोहोचवणार असून स्वतःच्या विरोधातील नाराजीचा व्यावसायिक फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

जगभरात हे टी शर्ट विकून लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान चीनमधील कंपन्या भरून काढणार आहेत. भारतात तर या टी शर्टची विक्रीदेखील सुरु झाली आहे. अनेक भारतीय लोक चीनच्या विरोधात या अभियानात सामील होत आहेत. चीनच्या कंपन्या एवढ्यावरच थांबलेल्या नाहीत. तर हे अभियान यशस्वी झाल्यानंतर #IHateChina या अभियानावर ते लक्ष केंद्रीत करणार असून अशा टी शर्टची देखील छपाई सुरु होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -