घरताज्या घडामोडीटार्गेट पूर्ण न केल्याने कंपनीने दिली 'अजब' शिक्षा, व्हिडीओ व्हायरल

टार्गेट पूर्ण न केल्याने कंपनीने दिली ‘अजब’ शिक्षा, व्हिडीओ व्हायरल

Subscribe

दिलेल्या वेळेत कर्मचाऱ्यांनी टार्गेट पूर्ण न केल्यास बॉसची बोलणी खावी लागतात. फार तर पगार वाढ थांबवली जाते. पण चीनमधील एका हॉटेल् चालवणाऱ्या कंपनीने भर कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना गुडघ्यावर रांगण्याची अजब शिक्षा दिल्याचे समोर आले आहे. या शिक्षेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कंपनीच्या या अजब कारभारावर सर्वस्तरातून टीका केली जात आहे.

चीनमधील जिलिन भागात एक रेस्टॉंरट आहे. या रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त ग्राहकांना रेस्टाँरटमध्ये आणण्याची जबाबदारी देण्यात आली होती. रेस्टाँरंटला प्रसिद्धी मिळवून देणे व ग्राहकांना आकर्षित करणे असे टार्गेट कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र वर्ष संपले तरी कर्मचाऱ्यांना अपेक्षित यश मिळवता न आल्याने कंपनी प्रशासन कर्मचाऱ्यांवर नाराज होते. याबद्दल वेळोवेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची कानउघडणीही केली. पण तरीही कर्मचारी टार्गेट पूर्ण करण्यात अयशस्वी झाले. यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांना कायमची अद्दल घडवण्याचा निर्णय कंपनीने घेतला. त्यानंतर कंपनीच्या वार्षिक समारंभात कंपनीला तोट्यात टाकणाऱ्या अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना कंपनीच्या मालकांनी खडे बोल सुनावले. त्यानंतर आपली चूक मान्य करा व गुडघ्यावर रांगत जा. अशी शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनीही निमूटपणे रांग लावत गुडघ्यावर रांगत शिक्षा पूर्ण केली. विेशेष म्हणजे यावेळी काही कर्मचाऱ्यांनी यापुढे आमच्याकडून चूक होणार नाही अशी घोषणबाजी करत जाहीर माफी मागितली. या घटनेचा व्हिडीओ सोशल साईटवर व्हायरल झाल्यानंतर सगळ्यांनीच कंपनीवर टीका केली. पण कर्मचाऱ्यांनी स्वत:हून ही कृती केल्याचे सांगत कंपनीने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

- Advertisement -

Embed Video

Start at

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -