फेसबुक, ट्विटरसह चिनी सोशल मीडियावर जो बायडेन यांचा बोलबाला

फेसबुक, ट्विटरसह चिनी सोशल मीडियावर जो बायडेन यांचा बोलबाला

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची सध्या फेसबुक आणि ट्विटवरसह चिनी सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ट्विटरसारखे चीनमधली वेबसाईट वीबोवर जो बायडेन यांच्याबद्दल केलेली पोस्ट ७३० मिलियनहून अधिक लोकांची पाहिली आहे. तसेच चीनचे फेसुबक म्हटले जाणारे वीचॅटवर जो बायडेन यांच्याबद्दलच्या पोस्ट लाखो लोकांनी वाचली आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकी दरम्यान चीनने आपल्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर कठोर नियम लादले होते. दरम्यान वीबोच्या एका युजरने एक हास्यास्पद गोष्ट सांगितली की, ‘सर्वांना अमेरिकेच्या निवडणुकीची काळजी आहे. पण मला शांघायचा महापौर कोण आहे, हेच माहित नाही आहे.’ वीबो या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जो बायडेन यांच्या संदर्भातच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात देखील बोलले जात आहे. जेव्हा एखादा मुद्दा सोशल मीडियावर पसरतो, तेव्हा तो सामान्य लोकांपर्यंत पोहोचतो.

पाहायला गेले तर चिनी लोकांना अमेरिकेच्या निवडणुकीत जास्त रस आहे. चीनच्या एका सोशल मीडियावर युजरने सांगितले की, ‘जो बायडेन जेव्हा पुढच्या वर्षी जानेवारीत व्हाइट व्हाऊसमध्ये प्रवेश करतील तेव्हा त्यांना अनेक अभूतपूर्ण आव्हानांचा सामना करावा लागले.’ तसेच या निवडणुकीबद्दल चिनी लोकं मत व्यक्त करीत आहे. चीनच्या एका मंत्रालयात काम करणारे संशोधक मेई जिन्यू यांनी वीचॅटवर लिहिले की, ‘हा बायडेन यांच्या विजय आहे, चीनचा नव्हे.’

अमेरिकेच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत केले आहे. जो बायडेन अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.


हेही वाचा – ट्रम्प यांचे व्हाइट हाऊस निसटले, बायकोही घटस्फोटाने करणार एक्झिट