‘मै भी चौकीदार’चे १५ लाख ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या नावापूर्वी चौकीदार शब्द जोडला आहे. यानंतर चौकीदार मोहीम सुरु झाली आहे. या मोहिमेला लोकांना उत्तम प्रतिसाद दिला आहे.

New Delhi
choukidar
प्रातिनिधिक फोटो

सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहत आहेत असून सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. अचारसहिते दरम्यान प्रचारावर बंदी असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार केला जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटचे नाव बदलून चौकीदार नरेंद्र मोदी केले होते. या नंतर सोशल मीडियावर चौकीदार मोहीम सुरु झाली.अनेक भाजप मंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचे नाव बदलून आपल्या नावापुढे चौकीदार लिहिले. हे चौकीदार आता ट्विटरवर ट्रेंड बनला असून #चौकीदार #चौकीदार फिरसे #मै भी चौकीदार अशा प्रकारचे हॅशटॅग सुरु आहे. मागील दोन दिवसांपासून हे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिग आहेत. पंतप्रधानांच्या मै भी चौकीदारला आतापर्यंत १५ लाख लोकांनी ट्विट केले आहे. पंतप्रधांनी चौकीदारची मोहीम सुरु केली असतानाच काँग्रेसने चौकीदार चोर असल्याची मोहीम सुरु केली आहे. भाजप आणि काँग्रेसदरम्यान आता हे युद्ध आपल्या ट्विटर मोहिमेअंतर्गत बघायला मिळते.

ट्विटरची आकडेवारी

ट्विटरची आकडेवारी

मागील काही दिवसांमध्ये ट्विटरवर राजकीय हॅशटॅग्सचा ट्रेंड सुरु आहे. या अतंर्गत मै चौकीदार या हॅशटॅगला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यानंतर चौकीदार फिरसे  आणि चौकीदार चोर है असे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. भाजपमधील राजकीय नेतेच नाही तर सामान्य नागरिकांनीही मै भी चौकीदारचा टॅटू काढला होता. टॅटू काढून त्यांनी पंतप्रधानांचे समर्थन केले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here