घरदेश-विदेशराफेलबाबत धक्कादायक माहिती समोर

राफेलबाबत धक्कादायक माहिती समोर

Subscribe

राफेल विमानांच्या ऐवजी युरो फायटरची निवड व्हावी यासाठी ख्रिश्चन मिशेलनं जोरदार फिल्डींग लावली होती अशी माहिती आता समोर येत आहे.

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये ताब्यात असलेला दलाल ख्रिश्चन मिशेलच्या बाबतील धक्कादायक खुलासा झाला आहे. राफेल विमानांच्या ऐवजी युरो फायटरची निवड व्हावी यासाठी ख्रिश्चन मिशेलनं जोरदार फिल्डींग लावली होती अशी माहिती आता समोर येत आहे. युरो फायटरसाठी पडद्याआड मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत होत्या अशी माहिती उपलब्ध कागदपत्रांमधून समोर आली आहे. ऑगस्ट २००७ मध्ये भारत सरकारने जेव्हा १२६ एमएमआरसीए फायटर विमानांच्या खरेदीसाठी आरएफपी काढली. त्यावेळी फ्रान्सच्या राफेल विमानाची अन्य पाच फायटर विमानांबरोबर स्पर्धा होती. पण, शेवटी राफेल की युरो फायटर? यापैकी एकाची निवड करायची होती. दरम्यान, युरोवर मात करत राफेलची निवड झाली होती. बुधवारी राफेल करारावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षाचे काही सदस्य कागदी विमान उडवत होते. तेव्हा अरूण जेटली यांनी युरोफायटरच्या स्मरणार्थ ही विमान उडवली जात आहेत असा टोला लगावला होता.

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील दलाल ख्रिश्चन मिशेल सध्या भारताच्या ताब्यात आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. ख्रिश्चिअन मिशेल आणि गुइडो हश्चेके हे दोघे राफेलच्या जागी युरो फायटरची निवड व्हावी यासाठी प्रयत्नशील होते. कार्यालय आणि घरातील कार्यालयादरम्यान टाकलेल्या छापेमारी दरम्यान कागदपत्रांवरून ही माहिती उपलब्ध झाली आहे. UK, जर्मनी, इटली आणि स्पेन या युरोपमधील कंपन्यांनी मिळून युरोफायटर विमानाची निर्मिती केली आहे.

- Advertisement -

वाचा – पैसे न मिळाल्यानं काँग्रेसनं राफेल करार रोखला – सीतारमण

राफेल करारावरून सध्या जोरदार आरोप – प्रत्यारोप रंगले आहेत. विरोधकांनी तर जेपीसी कमिटीद्वारे चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्यामध्ये आता नवीन खुलासे देखील दिवसेंदिवस होताना दिसत आहेत.

वाचा – Rafale deal : सत्तेत आल्यानंतर राफेल कराराची चौकशी – राहुल गांधी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -