घरदेश-विदेशराफेल डील: विमानाच्या किमतींवर आता चर्चा नाही

राफेल डील: विमानाच्या किमतींवर आता चर्चा नाही

Subscribe

राफेल विमानांच्या किमतींवर आता कोणतीही चर्चा होणार नाही, अशी स्पष्टोक्ती सुप्रीम कोर्टाने आज सुनावणी दरम्यान दिली.

राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेची सुनावणी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर आज घेण्यात आली. दरम्यान रंजन गोगाई यांनी सांगितले की, राफेल विमानांच्या खरेदी किमतीवर आता कोणतीही चर्चा होणार नाही, तसेच याची माहिती सार्वजनिक केली जाणार नाही. जेव्हा कोर्टाला वाटेल तेव्हा यातील काही पैलू सार्वजनिक केले जातील.

- Advertisement -

सरन्यायाधीशांनी आज संरक्षण खात्याची बाजू ऐकून घेण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की, आम्ही वायु सेनेच्या प्रकरणावर सुनावणी घेत आहोत. त्यामुळे वायु सेनेच्या एखाद्या अधिकाऱ्याने येऊन आपली बाजू मांडली तरी चालेल.

राफेल कराराची माहिती द्या – सर्वोच्च न्यायालय

- Advertisement -

अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी सुनावणी दरम्यान सांगितले की केंद्र सरकारने कोर्टाला राफेल विमानांच्या किमतीबद्दल फक्त माहिती दिली आहे. तसेच विमानाची तांत्रिक माहिती गोपनीयतेच्या नियमाखाली देता येणार नाही, तसा कराररच दोन देशांमध्ये झालेला असल्याचे त्यांनी सांगितले.

राफेल करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आणि त्याविरोधात याचिका दाखल करणारे वकिल प्रशांत भूषण यांनी सांगितले की, सरकार गोपनियतेची झालर ओढून राफेल विमानांची किमंत लपवत आहे. ते पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या काळात झालेल्या करारापेक्षा ४० टक्के अधिक किमतीने विमानांची खरेदी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -