घरदेश-विदेशगोव्यामध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने

गोव्यामध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने

Subscribe

पणजी पोलीस स्टेशनमध्ये काँग्रेसने तक्रार दाखल केली आहे. तर भाजपने सुध्दा काऊंटर एफआयआर दाखल केली आहे.

राफेल करार प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आता वेगवेगळ्या राज्यात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. तर अनेक ठिकाणी आंदोलन सुध्दा करण्यात आली. शनिवारी गोव्याची राजधानी पणजीमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते या मुद्द्यावरुन आमने-सामने आले आहेत. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. काँग्रेस कार्यकर्ते गांधीवादी विचाराने विरोध प्रदर्श करत फुल वाटत होते. काँग्रेसने आरोप केला आहे की, या दरम्यान भाजपचे प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर समोसा फेकून मारला. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. तर भाजप प्रदेश अध्यक्षांनी देखील काँग्रेसवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना आवरले.

- Advertisement -

भाजप कार्यर्त्यांनी केली मारहाण

राफेल करारावरुन विरोध प्रदर्शनावेळी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. ज्यानंतर पणजी पोलीस स्टेशनमध्ये काँग्रेसने तक्रार दाखल केली आहे. तर भाजपने सुध्दा काऊंटर एफआयआर दाखल केली आहे. गोवा भाजप प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी आरोप केला आहे की, काँग्रेस कार्यकर्तेयांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. तर गोवा काँग्रेस महिला विंगच्या अध्यक्ष प्रतिमा कॉटिन्होने एफआयआरनुसार शुक्रवारी संध्याकाळी विरोध प्रदर्शन दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली.

दोन्ही पक्षांविरोधात तक्रारी दाखल

प्रतिमा कॉटिन्हो यांनी सांगितल्या नुसार, जेव्हा नेत्यांनी आमच्याशी संपर्क केला तेव्हा आम्ही शांत राहिलो आणि शांतीने स्वागत केले. आम्ही त्यांना फुलं भेट दिली होती. आमची गांधिगिरी पाहून प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर भडकले आणि आम्ही त्यांना दिलेली समोस्याचे ताट फेकून दिले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले की, त्यानंतर त्यांनी फुलांना फेकून दिले. काँग्रेसने केलेल्या तक्रारीवरुन भाजपच्या अज्ञात कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला. तर भाजप कार्यकर्त्या कविता कंडोलकर यांनी काऊंटर एफआयआर केली आहे. त्यामध्ये त्यांनी आरोप केला आहे की, कांग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बॉटल, समोरे आणि लाकडी तुकडे फेकून आम्हाला हुस्कावण्याचा प्रयत्न केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -