घरCORONA UPDATEदिलासा! Oxford च्या कोरोना लशीच्या चाचण्यांवरील बंदी उठवली; भारतातही चाचण्या सुरू

दिलासा! Oxford च्या कोरोना लशीच्या चाचण्यांवरील बंदी उठवली; भारतातही चाचण्या सुरू

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे पाहता सर्व जगाचे लक्ष लागलेल्या AstraZeneca आणि Oxfordने विकसित केलेल्या लशींच्या चाचण्यांवरची बंदी उठवण्यात आली आहे. या लशीच्या मानवी चाचण्यांदरम्यान एका व्यक्तिची प्रकृती बिघडल्याने सरकारने तात्पुरती बंदी घातली होती. ब्रिटनच्या Medicines Health Regulatory Authority (MHRA)ने पुन्हा परवानगी दिल्याचे सांगितले आहे. या औषधाच्या चाचण्या या पूर्णपणे सुरक्षीत असल्याचे MHRAने म्हटले आहे. तसेच भारतातील या लसीची चाचणीदेखील सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

ब्रिटनमध्ये एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने या चाचण्या थांबिण्यात आल्या होत्या. त्यावर तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल दिला असून त्यात चाचण्या पुन्हा सुरू करण्यास हरकत नाही, अशी शिफारस केली आहे. दरम्यान, भारतात पुण्यासह काही शहरांमध्ये या चाचण्या सुरू असून सीरम इन्स्टिट्यूट या लशीचे उत्पादन करणार आहे.

लस दिलेल्या यूकेतील महिलेच्या पाठीच्या मणक्यातील हाडाला गंभीर सूज आली होती. असं खूप कमी पाहायला मिळतं. त्यामुळेच ट्रायल रोखल्याचं कंपनीने सांगितलं होतं. बुधवारी अ‍ॅस्ट्रॅजेनेका तर गुरुवारी सीरमने इन्स्टीट्युटनेही या लशीचं ट्रायल थांबवण्याचा निर्णय घेतला होता. ब्रिटनमध्ये बंदी घाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सीरमलाही भारतात चाचण्या थांबविण्यास सांगण्यात आलं होतं. जोपर्यंत औषधाच्या सुरक्षेचा निर्वाळा येत नाही तोपर्यंत चाचण्या करू नका, असे निर्देश देण्यात आले होते.

- Advertisement -

हेही वाचा –

KEM Chaos : गुन्हेगाराला अटक न केल्यास संप पुकारणार; डॉक्टरांचा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -