घरदेश-विदेशबापरे! मुख्यमंत्र्यांच्या घराचे दरवाजे आणि खिडक्या ७३ लाखांचे!

बापरे! मुख्यमंत्र्यांच्या घराचे दरवाजे आणि खिडक्या ७३ लाखांचे!

Subscribe

मुख्यमंत्र्यांच्या घरच्या खिडक्या किती रुपयांच्या आहेत माहिती आहे का?

मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल अशा राज्यातल्या आणि देशातल्या सर्वात महत्त्वाच्या पदी असणाऱ्या व्यक्तींचं राहणीमान तितकंच विशेष असतं. पण ते तितकंच खर्चिक देखील असतं आणि त्यांच्या त्या राहणीमानाचा खर्च थेट करदात्यांना सोसावा लागतो हे नुकतंच समोर आलं आहे. आन्ध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी त्यांच्या बंगल्याच्या नुतनीकरणासाठी केलेला खर्च सध्या सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. सरकारी तिजोरीतून त्यांच्या बंगल्याच्या नुतनीकरणासाठीचा एकूण खर्च मंजूर झाला आहे तब्बल ४ कोटी ८० लाख रुपये. त्यातल्या ७३ लाखांच्या तर फक्त दरवाजे आणि खिडक्याच आहेत! माजी मुख्यंमत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी यासंदर्भातला आन्ध्र प्रदेश सरकारचा सरकारी आदेशच (जीआर) त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

- Advertisement -

गुंटूर जिल्ह्यातल्या ताडपल्ली या ठिकाणी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचं निवासस्थान आहे. त्याच्या नुतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी तपासणी केल्यानंतर सरकारकडून निधी मंजूर करण्यात आला. या निधीची एकूण रक्कम ४ कोटी ८० लाखांच्या घरात जाते. त्यामध्ये ७३ लाखांच्या खिडक्या आणि दरवाजे, ८२ लाख रुपये प्रजा दरबारासाठी आणि व्यू कटरसाठी तब्बल ३ कोटी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

याआधी देखील जगनमोहन रेड्डी यांच्या बंगल्याच्या नुतनीकरणाचा खर्च चर्चेत आला होता. मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर लगेचच त्यांच्या बंगल्यापुढे तब्बल ५ कोटी रुपयांचा खर्च करून रस्ते बांधण्यात आले होते. तर ३ कोटी ६० लाख रुपयांचं इलेक्ट्रॉनिकचं काम करण्यात आलं होतं. त्यासोबतच हेलिपॅड देखील बांधण्यात आलं होतं. दरम्यान, जगनमोहन रेड्डी यांच्या परदेश दौऱ्यावर देखील सरकारी तिजोरीतूनच खर्च झाल्याचं बोललं जात आहे. नुकताच त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत जेरुसलेममध्ये सुट्टीचा दौरा केला होता. त्यावर तब्बल २२ लाख ५२ हजार रुपयांचा खर्च झाल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

राज्यात एकीकडे आर्थिक समस्या समोर असतानाच मुख्यंमत्र्यांच्या घराच्या नुतनीकरणासाठी इतका खर्च होत असल्यामुळे नेटिझन्सनी त्यावर टीका केली आहे.

View this post on Instagram

#jogendraversion

A post shared by Y S JAGAN MOHAN REDDY (@ys.jaganmohanreddy) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -