घरदेश-विदेशकॉफी पिताय? मेंदू रोगांवर कॉफी करते 'हा' परिणाम

कॉफी पिताय? मेंदू रोगांवर कॉफी करते ‘हा’ परिणाम

Subscribe

जर तुम्हाला ही कॉफी प्यायला आवडते तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. कारण अनेकदा कॉफीचे फायदे- तोटे आपण ऐकत असतो. पण कॉफीतील काही घटक मेंदू रोगावर फायदेशीर आहेत, असे एका संशोधनात समोर आले आहे. कॉफीतील काही संयुगांमुळे पार्किन्सन अर्थात कंपवात रोखला जाऊ शकतो. कंपवात आणि डिमेन्शिया या मेंदूच्या ऱ्हासामुळे होणाऱ्या रोगांवर ठोस उपाय असा काहीच नाही. पण कॉफीतील काही संयुगामुळे या रोगांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे देखील संशोधनातून समोर आले आहे.

वाचा- शरीराला पोषकमूल्य देणारे किचनमधील पदार्थ

कॉफीतील दोन संयुगे महत्वाची

कॉफी चांगली असे म्हणताना कॉफीमधील दोन संयुगे एकत्र सेवन केली तरच याचा फायदा होऊ शकतो. कॉफीमधील कॅफेन या घटकाविषयी आपल्याला अधिक माहिती आहे. पण त्यातील इतर अनेक घटकांचा कधीही अभ्यास करत नाही. अमेरिकेतील रुटगर्स विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार एकोसायनोल- ५ हायड्रॉक्सीटिप्टामाईड ( EHT) या संयुगाचे प्रमाण कॉफीमध्ये अधिक असते. हे कॉफीच्या कवचात आढळते. कॅफीन आणि एकोसायनोल- ५ हायड्रॉक्सीटिप्टामाईड यांचे एकत्र सेवन केल्यास त्याचा अधिक फायदा होतो.

- Advertisement -
हे माहीत आहे का- त्वचेसाठी पोषक असे नारळाचे दूध

उंदरावर केला प्रयोग

संशोधकांनी हा प्रयोग उंदरांवर करुन पाहिला. त्यांनी उंदरांना कॅफीन आणि एकोसायनोल- ५ हायड्रॉक्सीटिप्टामाईड दिले असता. त्यांचा उंदरावर चांगला परिणाम झाला. त्यांच्या मेंदूत प्रथिने साचण्याचे प्रमाण कमी झाले. अधिक प्रयोगासाठी या दोन गोष्टी वेगवेगळ्या देऊन पाहिल्या त्यावेळी त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे प्रयोगाअंती या दोन्ही गोष्टींचे एकत्र सेवन हे अत्यंत महत्वाचे असते.

पुढील काळात अधिक प्रयोगाची गरज

सध्या कंपवातावर उपचार केले जातात. पण मेंदूच्या ऱ्हास रोखण्यासाठी ठोस असे उपाय केले जात नाहीत. कॉफीमधील संयुगामुळे मेंदूचा ऱ्हास रोखला जातो. हे संशोधनातून समोर आले असले तरी त्यावर अधिक प्रयोग होणे गरजेचे आहे, असे देखील या संशोधनात म्हटले आहे. ( PTI)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -