…म्हणून दिल्लीतील टॅक्सी ड्राईव्हर सोबत ठेवतात ‘कंडोम’!

New Delhi

तुम्ही दिल्लीत आहात… तेथील कॅबमधून प्रवास करत आहात…अचानक तुमचे डोके दुखू लागले, तर कॅब चालकाकडे त्याचा फस्ट एड बॉक्स जरूर मागा. पण तो बॉक्स खोलल्यावर त्यात तुम्हाला दोन-तीन कंडोम दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. दिल्लीतील प्रत्येक कॅबमध्ये फस्ट एड बॉक्स असतो आणि त्यात कंडोम निश्चित ठेवला जातो. ते दिल्लीकरांना तसेच तेथील ट्रॅफिक पोलिसांनाही माहित आहे. मात्र ते त्यावर चकार शब्दही उच्चारत नाही. किंवा त्यांना त्याचे विशेष काहीच वाटत नाही.

का ठेवला जातो कंडोम?

दिल्लीतील कॅबमधील फस्ट एड बॉक्समध्ये कंडोम ठेवला जातो, त्याचे कारण मात्र वेगळेच आहे. अनेकदा रस्ता अपघातात होणारे मृत्यू हे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने होतात. हा रक्तस्त्राव रोखला तर अपघातग्रस्तांचे प्राण वाचवणे सहज शक्य असते. तो रक्तस्त्राव रोखण्यासाठी कंडोमचा चांगला वापर होतो. समजा अपघातात तुमच्या तळव्याला मोठी जखम झाली आणि त्यातून रक्तही मोठ्या प्रमाणात बाहेर येऊ लागले. तर अशावेळी मांडीला कंडोम ताणून बांधल्यास रक्तस्त्राव रोखण्यास मदत होते. ताणून बांधलेला कंडोम मुख्य रक्तवाहिनीतून बाहेर येणारे रक्त रोखण्यास मदत करतो. तसेच तो रबराचा असल्यामुळे त्याने त्वचेवर रॅशही येत नाहीत. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून दिल्लीतील कॅब चालक आपल्या फस्ट एड बॉक्समध्ये कंडोम ठेवतात.

तो नियम आहे का?

कॅब चालकांनी आपल्या फस्ट एड बॉक्समध्ये कंडोम ठेवण्याचा कुठलाही वाहतूक नियम दिल्लीत नाही. त्यांच्या फस्ट एड बॉक्समध्ये पॅरासिटेमॉल गोळ्या, बॅण्डेज, डेटॉल हे ठेवणे बंधनकारक आहे. वाहतूक पोलीस हे कॅब चालकांना रोखतात तेव्हा ते त्यांच्याकडील फस्ट एड बॉक्स प्रथम तपासतात. त्यामुळे दिल्लीतील कॅब चालक आपल्याकडे फस्ट एड बॉक्स न चुकता ठेवतात. हे ट्रॅफिक पोलीस कॅब चालकांना तुम्ही कंडोम का ठेवला आहे?, हे कधीही विचारत नाहीत. त्यामुळे दिल्लीतील बहुसंख्य कॅब चालकांच्या फस्ट एड बॉक्समध्ये तुम्हाला कंडोम हमखास दिसून येतो.