घरदेश-विदेश'३ किलो गोमांस शोधणारे मोदी ३५० किलो आरडीएक्स शोधू शकले नाहीत'

‘३ किलो गोमांस शोधणारे मोदी ३५० किलो आरडीएक्स शोधू शकले नाहीत’

Subscribe

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस नेते हारून युसुफ यांनी मोदींवर टिकाकेली आहे. ट्विट करत त्यांनी मोदी ३ किलो गोमांस शोधूशकतात पण ३५० किलो आरडीएक्स नाही अशी टिका केली आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भाजपचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते हारून युसूफ यांनी टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी ट्विट करत मोदींना लक्ष्य केले आहे. ‘नरेंद्र मोदीजी तीन किलो गोमांस शोधू शकतात. परंतु, ३५० किलो आरडीएक्स शोधू शकत नाहीत.’ अशी टीका युसूफ यांनी केली आहे. ‘इतके आरडिएक्स आले कुठून. आरडीएक्स येईपर्यंत सरकार झोपले होते का?’ अशा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.

मोदी सरकारवर आरोप

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सुमारे ८० किलो वजनाचे आरडिएक्स वापरले गेले, अशी माहीती समोर येत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात घातक आरडिएक्स आला कसा आणि कधी याबद्दल आता सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. देशात गोमांस बंदी असून त्यावर बारकाईने नजर ठेवणाऱ्या मोदींचे इतक्या मोठ्या घटनेकडे दुर्लक्ष कसे झाले, असा सवाल ट्विटरवरुन हारून युसुफ यांनी केला आहे. दरम्यान कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी देखील पत्रकार परिषद घेत मोदींना पुलवामा हल्ल्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता युसूफ यांनी ट्विट केले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले रणदीप सुरजेवाला

पुलवामा दहशतवादी हल्लानंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात होती. मात्र, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जिम कॉर्बेट पार्कमध्ये संध्याकाळी एक चित्रपटासाठी शूटिंग करत होते. हे अतिशय खेदजनक आहे. यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. इतर वेळी बुद्धीमता दाखवणारे मोदी यावेळी सपशेल अपयशी ठरले असून आपल्या नाकर्तेपणामुळे हल्ल्यात ४० जवानांना आपला जीव गमवावा लागाला. पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश- ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्विकरली असली तरी ४८ तास आधी त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला होता. त्याकडे दुर्लक्ष का केले गेले? असा सवाल रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -