घरदेश-विदेशपवार-सोनिया भेट शिवसेनेसाठी निष्फळ; सत्तास्थापनेची कोणतीही चर्चा नाही

पवार-सोनिया भेट शिवसेनेसाठी निष्फळ; सत्तास्थापनेची कोणतीही चर्चा नाही

Subscribe

राज्यात सत्ता स्थापन करण्यासंबंधी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीतून सत्ता स्थापनेच्या दिशेने काहीतरी ठोस पाऊल उचलले जाईल, अशी अपेक्षा तीनही पक्षातील नेते व्यक्त करत होते. मात्र बैठकीनंतर शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून सत्ता स्थापनेतला गोंधळ वाढत चालल्याचे समोर आले आहे. “शिवसेनेबाबत सत्ता स्थापन करण्यासंबंधी अजून ठोस निर्णय झालेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मात्र आघाडीत असलेल्या इतर पक्षांशी देखील चर्चा करणे गरजेचे आहे”, असे शरद पवार यांनी सांगितले.

#Live : शरद पवार दिल्ली येथून पत्रकार परिषद घेत आहेत

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ನವೆಂಬರ್ 18, 2019

- Advertisement -

शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, “ज्याप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीत निवडणूक लढवली होती. त्यासोबतच राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष देखील सामील होता, त्यांचा एक आमदार निवडून आलेला आहे. तसेच शेकाप, सपा, कवाडे गट आमच्यासोबत होते. त्यामुळे या पक्षांशी देखील चर्चा केली जावी, असे आम्हाला वाटतं. आघाडीतील मित्रपक्षांना आम्ही नाराज करु शकत नाही.”

महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर आमच्यात चर्चा झाली. मात्र कुणासोबत सत्ता स्थापन करायची यावर चर्चा झाली नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. तसेच किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी कुठलीही बैठक झाली नसल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे गोंधळात आणखीच भर पडलेली आहे. कारण मागच्या आठवड्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र बैठक घेऊन किमान समान कार्यक्रमावर चर्चा केली होती. त्याचे व्हिडिओ आणि फोटो देखील बाहेर आले होते.

- Advertisement -

नवनीत कौर राणा कोण आहेत?

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत खासदार नवनीत कौर राणा यांनी आज लोकसभेत बोलताना राज्यातील राष्ट्रपती राजवटीसंदर्भात शिवसेनेवर टीका केली होती. तसेच भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली पाहीजे, असेही त्या म्हणाल्या होत्या. याबद्दल शरद पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी कोण नवनीत कौर राणा? असा प्रतिप्रश्न केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती काय असेल? याचा सल्ला आम्हाला कुणीही देण्याची गरज नसल्याचे पवार म्हणाले.

मोदींचे कौतुक माझ्या संसदीय कामासाठी

राज्यसभेचे आज २५० वे अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तोंडभरून कौतुक केले. मात्र मोदींनी केलेले कौतुक हे फक्त संसदीय कार्यप्रणालीसाठी असल्याचे सांगितले. याआधी देखील माझ्या पंच्याहत्तरीच्या कार्यक्रमात मोदींनी हेच सांगितले असल्याची देखील आठवण त्यांनी करुन दिली. माझ्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत मी आजपर्यंत सभागृहात जागा सोडून व्हेलमध्ये येत आंदोलन केलेले नाही. लोकशाहीच्या मर्यादेत राहूनच माझे म्हणणे मांडले आहे. याबाबतच मोदींनी राज्यसभेत उल्लेख केला असल्याचे पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -