घरदेश-विदेशदेशातील पहिली तृतीयपंथी पक्ष पदाधिकारी

देशातील पहिली तृतीयपंथी पक्ष पदाधिकारी

Subscribe

काँग्रेसनं अप्सरा रेड्डी या तृतीयपंथीयाची महिला शाखेच्या जनरल सेक्रेटरीपदी नियुक्ती केली आहे.

काँग्रेसनं अप्सरा रेड्डी या तृतीयपंथीयाची महिला शाखेच्या जनरल सेक्रेटरीपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेस हा देशातील जवळपास १३३ वर्षे जुना पक्ष आहे. अप्सरा रेड्डी यांच्या रूपानं काँग्रेसनं राष्ट्रीय पातळीवर पहिल्यादाच तृतीयपंथी पदाधिकारी नेमला आहे. रेड्डी यांची ओळख एक पत्रकार आणि तृतीयपंथी कार्यकर्ता म्हणून आहे. राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये ही नेमणूक करण्यात आली आहे. अप्सरा रेड्डी यांनी यापूर्वी सामाजिक कामासह, लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांवर देखील काम केलं आहे. यापूर्वी अप्सरा रेड्डी यांनी भाजपा आणि एआयएडीएमकेमध्ये देखील काम केलेलं आहे. दरम्यान, एआयएमसीच्या महिला अध्यक्षांनी रेड्डी यांच्या नियुक्तीचं स्वागत केलं आहे. नियुक्ती नंतर बोलताना अप्सरा रेड्डी यांनी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, सामाजिक असमानता आणि महिलांशी निगडीत प्रश्नांवर आता राष्ट्रीय स्तरावर काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -