घरट्रेंडिंगकाँग्रेसला १०९ आमदारांचा पाठिंबा, राजस्थानमध्ये मध्यरात्री २.३० ला पत्रकार परिषद!

काँग्रेसला १०९ आमदारांचा पाठिंबा, राजस्थानमध्ये मध्यरात्री २.३० ला पत्रकार परिषद!

Subscribe

राजस्थानमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे अशोक गेललोत यांच्या अडचणी वाढत चालल्या असून त्यातून काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. पक्षामधील नाराज उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी अशोक गेहलोत यांचे सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात तसे स्पष्ट केले आहे.  गेहलोत यांनी केलेल्या दाव्याला पाठिंबा देण्यासाठी रात्री २.३० वाजता पत्रकार परिषद घेतली.

- Advertisement -

१०९ आमदारांचा काँग्रेसचा दावा

जयपूरमध्ये अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकारपरिषदेत काँग्रेसने आपल्याकडे १०९ आमदार असल्याचा दावा केला आहे. विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यानंतर काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे नी यावेळी सांगितलं की,  गेहलोत यांच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान सरकार तसंच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास असलेल्या १०९ आमदारांनी पत्रावर स्वाक्षरी केली आहे.

- Advertisement -

गेहलोत सरकार अल्पमतात?

सचिन पायलट यांनी आपल्याला आपल्याकडे पक्षाच्या ३० पेक्षा जास्त आमदारांचा, काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. तसेच सोमवारी सकाळी जयपूरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. तर काँग्रेसचे सरचिटणीस आणि राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी काँग्रेसचे सर्व आमदार माझ्या संपर्कात आहेत. सरकार पूर्णपणे स्थिर असून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. सचिन पायलट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु असून त्यांच्यासाठी संदेश दिला आहे, असे पांडे यांनी संगितले.

गेल्या महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी, राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार फोडण्याचे डावपेच भाजप आखत असल्याची तक्रार पोलिसांत केली होती. त्याआधारे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या कथित कारस्थानाच्या चौकशीला गती दिली. त्यासंदर्भात गेहलोत यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन २५-३० कोटी देऊन काँग्रेसचे आमदार खरेदी करण्याचा आणि राजस्थानातील सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप पुन्हा केला.


हे ही वाचा – फक्त ही पाच वर्ष नाही तर पुढच्या निवडणुकाही एकत्र लढू – शरद पवार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -