काँग्रेसने १० सप्टेंबरला दिली भारत बंदची हाक

मोदी सरकारला जागे करण्यासाठी आणि देशभरातील जनतेच्या आक्रोशाची भावना लक्षात घेता काँग्रेसने १० सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे.

Delhi
congress calls bharat bandh
काँग्रेसने दिली भारत बंदची हाक

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. आता पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरुन राजकारण देखील तापायला सुरुवात झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीच्याविरोधात काँग्रेसने भारत बंदची हाक दिली आहे. मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने १० सप्टेंबरला भारत बंदचे आवाहन केले आहे. काँग्रेसच्या भारत बंदला विरोध पक्ष, सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा देखील दिला आहे.

१० सप्टेंबरला भारत बंद

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारला जागे करण्यासाठी आणि देशभरातील जनतेच्या आक्रोशाची भावना लक्षात घेता भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेसने १० सप्टेंबरला दिलेल्या भारत बंदला सकाळी 9 वाजता सुरूवात होणार आहे. असून दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे. जेणेकरून सामान्य लोकांना त्याचा त्रास होणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात किंती कमी होऊन देखील देशातील इंधनाच्या किंती लागोपाठ वाढतच चालल्या आहेत. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची किंमत ७२ रुपये झाली आहे. मोदी सरकारने गेल्या साडे चार वर्षात पेट्रोल-डिझेलवर टॅक्स लावून जवळपास ११ लाख कोटी रुपये कमावले. हे पैसे कोणाच्या खिशात गेले याचे सरकारने अजूनही उत्तर दिले नसल्याचे सुरजेवाल यांनी म्हटले आहे.

महागाईने जनता त्रस्त

आज देशातला कोणताही वर्ग खूश नाही. महागाईने सर्व जनता त्रस्त झाली आहे. आणि पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीने जनता हैराण आहे. त्यामुळे हिंसेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळेच आम्ही भारत बंदची हाक दिली आहे. आज सकाळी झालेल्या बैठकीत १० सप्टेंबरला भारत बंदचा निर्णय झाला असल्याचे काँग्रेसचे महासचिन अशोक गेहलोत यांनी सांगितले.