घरदेश-विदेशभाजपला मोठा झटका; मनोहर पर्रिकरांच्या जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी

भाजपला मोठा झटका; मनोहर पर्रिकरांच्या जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी

Subscribe

गोव्यामध्ये भाजपला मोठा झटका बसला आहे. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या जागेवर पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे.

लोकसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. सध्या मतमोजनी सुरु आहे. या मतमोजनीतून भाजप देशभरात सर्वाधिक जागांवर आघाडी असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे भाजप पुन्हा सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशभात आघाडीवर असणाऱ्या भाजपला गोव्यात मोठा धक्का बसला आहे. गोव्याचे दिवगंत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या पणजी मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अटानेसियो मॉनसरेट विजयी झाले आहेत.

मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर पणजी विधानसभा मतदारसंघ जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक लढवण्यात आली. या निवडणुकीत भाजपचे सिद्धार्थ कुंकळीकर उमेदवारी लढवत होते. परंतु, भाजपची जागा राखण्यात कुंकळीकर अपयशी ठरले आहेत. काँग्रेसचे मेदवार अटानेसियो मॉनसरेट यांनी २७७४ मतांनी विजय मिळवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -