काँग्रेसच्या सर्वेतही भाजपचा बोलबाला

लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरच्या परिस्थीतीचा कानोसा घेण्यासाठी काँग्रेसकडूनही एक्झिट पोल घेण्यात आला, असून या एक्झिट पोलमध्ये देखील भाजपाला सर्वात अधिक जागा मिळाल्याचे समोर आले आहे.

Delhi
Congress exit polls
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान आटोपल्यानंतर देशातील सर्वच विविध वृत्तसंस्थांनी आपापले एक्झिट पोल जाहीर केले. या एक्झिट पोलमध्ये एनडीए बहुमतापर्यंत पोहोचेल, असा सर्वसाधारण अंजाद वर्तवण्यात आला होता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरच्या परिस्थीतीचा कानोसा घेण्यासाठी काँग्रेसकडूनही एक्झिट पोल घेण्यात आला, असून या एक्झिट पोलमध्ये देखील भाजपाला सर्वात अधिक जागा मिळाल्या आहेत. मात्र, भाजपाला बहुमत मिळणार नसल्याचे समोर आले आहे. तर एनडीएला यूपीएपेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र भाजपाला दोनशेहून कमी जागा मिळतील आणि एनडीएला केवळ २३० पर्यंत जागा मिळतील,असे या एक्झिट पोलमधअये म्हटले आहे. तर कॉंग्रेस स्वबळावर १४० जागा जिंकेल आणि यूपीएला १९५ जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. राजातल्या ४८ पैकी ४७ जागांवर उमेदवार उभ्या करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता येणार नसल्याचा अंदाज राज्यातल्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

यूपीएला याठिकाणी मिळणार चांगले यश

कॉंग्रेसने घेतलेल्या अंतर्गत एक्झिट पोलनुसार यूपीएला तामिळनाडू, केरळ आणि पंजाबमध्ये चांगले यश मिळेल. तसेच बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गजरात, झारखंड आणि हरियाणा या राज्यांमध्येही पक्षाची कामगिरी चांगली होणार आहे. यूपीएला बिहारमध्ये १५, महाराष्ट्रात २२ ते २४, तामिळनाडूत ३४ केरळमध्ये १५, कर्नाटकात ११ ते १३ दक्षिण आणि मध्य प्रदेशात ८ ते १० जागा मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

त्याशिवाय गुजरातमध्ये ७, हरियाणात ५ ते ६, छत्तीसगडमध्ये ९ आणि पूर्वोत्त राज्यांत ९ ते १० जागा मिळण्याची अपेक्षा काँग्रेसमध्ये आहे. सर्व एक्झिट पोल काँग्रेसला उत्तर प्रदेशात केवळ २ जागा देत असले तरी या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये ५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. दरम्यान, दक्षिण भारतात काँग्रेस आणि एनडीएला चांगले यश मिळेल,अशी अपेक्षा या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आली आहे. विविध निवडणूक क्षेत्रांमध्ये उपस्थित असलेले २६० पर्यवेक्षक, राज्यांचे प्रभारी आणि स्थानिक नेत्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर काँग्रेसने ही आकडेवारी मिळवली आहे.


वाचा – पुढचे २४ तास महत्त्वाचे! राहुल गांधींचं कार्यकर्त्यांसाठी ट्विट


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here