Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश काँग्रेस केवळ देशभक्तांचा अपमान करतं; गोडसेंना दहशतवादी म्हणण्यावरुन प्रज्ञा सिंह यांची टीका

काँग्रेस केवळ देशभक्तांचा अपमान करतं; गोडसेंना दहशतवादी म्हणण्यावरुन प्रज्ञा सिंह यांची टीका

Related Story

- Advertisement -

काँग्रेस केवळ देशभक्तांचा अपमान करतं म्हणत भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांच्यावर निशाणा साधला. दिग्विजय सिंग यांनी नथुराम गोडसेला पहिला दहशतवादी म्हटलं होतं. यावर बोलताना प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेस केवळ देशभक्तांचा अपमान करतं असं म्हणत गोडसेंना देशभक्त ठरवायचं आहे की काय, असा सवा देखील केला जात आहे.

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी नथुराम गोडसेला पहिला दहशतवादी म्हटलं. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस केवळ देशभक्तांचा अपमान करतं. भगव्या आतंकवादाचा उल्लेख देखील त्यांनी केला. याहून अधिक वाईट गोष्ट ती काय? असं प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या. २०१९ लोकसभा निवडणुकी वेळी साध्वी प्रज्ञाने नथुराम गोडसे याचं देशभक्त असा उल्लेख केला होता. याबद्दल पक्षाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर साध्वी यांनी माफी मागितली. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील स्पष्टीकरण दिलं होतं.

- Advertisement -

ग्वाल्हेरमध्ये महात्मा गांधींचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसे याच्या नावाने ज्ञानशाळा उघडण्यात आली. त्याची स्थापना दौलतगंज कार्यालयात हिंदु महासभेने केली होती. तसंच येथे गोडसे याची पूजा देखील करण्यात आली. यानंतर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी टीका केली होती.

 

- Advertisement -