काँग्रेस शहरी नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ उभा रहातोय – मोदी

पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

Mumbai
Narendra modi from red fort
नरेंद्र मोदी (सौजन्य - इंडिया डॉट कॉम)

काँग्रेस पक्ष नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ उभा रहातोय, अशी टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले. शहरी नक्षलवाद्यांनी मुलांच्या हातात लेखणी देत नाहीत तर शस्त्रे देत आहेत. त्यातून ते त्यांच्या आईवडिलांचं स्वप्न उद्ध्वस्त केले. सरकार नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करत त्यांचे प्रयत्न हाणून पाडत आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. नक्षलवादी लोकांपासून छत्तीसगडला वाचवायचे असेल, तर छत्तीसगड आणि बस्तरमधील सर्व जागांवर कमल फुलले पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

छत्तीसगड विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते शुक्रवारी जगदलपूर येथे जनतेला संबोधित करत होते.छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकांना तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे तेथे निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. एकाच दिवशी मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी छत्तीसगड दौर्‍यावर आहेत. त्यामुळे येथे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जगदलपूर येथील सभेत मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस पक्ष दलित आणि वंचितांना मतांचा खजिना समजते. मात्र, त्यांच्यासाठी त्यांनी काहीच केले नाही. पण अटलबिहारी वाजपेयींनी आदिवासींसाठी समिती स्थापन केली, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला धारेवर धरले.

लिंग, जात धर्म आणि इतर कारणांवर भेदभाव न करता आम्ही ’सबका साथ सबका विकास’ या मुद्यावर राजकारण करतो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वीच्या सरकारांना फैलावर घेतले. आपल्या प्रचार कार्यक्रमात पंतप्रधान मोदी राज्यातील विकास कामांचा पाढा वाचत होते. तसेच भाजप सरकारने आतापर्यंत आणलेल्या योजना लोकांपुढे मांडत होते. तर, अटलजींच्या स्वप्नांचा देश घडवल्यापर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असेही मोदी येथे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here