घरदेश-विदेशपंतप्रधान मोदींची ‘सरकारी कंपनी बेचो' मोहीम; राहुल गांधींचा घणाघात

पंतप्रधान मोदींची ‘सरकारी कंपनी बेचो’ मोहीम; राहुल गांधींचा घणाघात

Subscribe

काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्राती मोदी सरकार सरकारी कंपन्यांचं खासगीकरण करत आहे. २६ कंपन्यांचं खासगीकरण करणार असून यातील २३ कंपन्यांना केंद्रानं मंजूरी दिली आहे. दरम्यान, आता एलआयसीतील सरकारची २५ टक्के भागीदारी विकणार आहे. यावरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

“मोदीजी, सरकारी कंपनी विका मोहीम चालवत आहेत. स्वतःच निर्माण केलेल्या आर्थिक अरिष्टाची भरपाई करण्यासाठी देशाची संपत्ती थोडी थोडी करून विकली जात आहे. जनतेचं भविष्य आणि विश्वास बाजूला ठेवून एलआयसीला विकणं मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न आहे,” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघात केला आहे.

- Advertisement -

देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार निर्गुंतवणुकीच्या धोरणावर जोर देत आहे. याआधी काही सरकारी कंपन्यांमधली हिस्सेदारी विकली आहे. दरम्यान, आता पुन्हा २६ कंपन्यांचं खासगीकरण केलं जाणार आहे. त्यापैकी २३ कंपन्यांना केंद्राने मंजूरी देखील दिली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -