रिकाम्या बोगद्यात हात दाखवणं बंद करा अन् जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या

congress leader rahul gandhi criticized pm narendra modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. पंजाबमधील तीन दिवसीय किसान यात्रेनंतर राहुल गांधी हरियाणामध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी ट्विट करत पंतप्रधान मोदंवर हल्ला चढवला आहे. रिकाम्या बोगद्यात हात दाखवणं बंद करा अन् जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधींनी लिहिलं की, “पंतप्रधान जी, रिकाम्या बोगद्यात हात दाखवणं बंद करा आणि मौन सोडा. प्रश्नांचा सामना करा, जनता आपल्याला प्रश्न विचारतेय.”

दरम्यान, राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये तीन दिवस ट्रॅक्टर रॅली काढली आणि त्यानंतर मंगळवारी ते हरियाणा येथे पोचले आहेत. हरियाणामध्ये दोन दिवस सभा घेणार आहेत. यानंतर दिल्लीमध्ये शेती वाचवा यात्रेचा शेवट होईल. दरम्यान, राहुल गांधी यांनी मंगळवारी पटियाला येथे पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. रातीन कृषी कायद्यांतून शेतकऱ्यांना संपवलं जात आहे आणि बड्या उद्योगपतींसाठी मार्ग तयार केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वत: ला या तिन्ही कायद्यांविषयी माहिती नाही असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.