Video: …आणि राहुल गांधी यांनी स्थलांतरीत मजुरांशी असा साधला संवाद

New Delhi

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पायी चालत जाणाऱ्या मजुरांसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यावर भाजप नेत्यांनी सडकून टीका केली होती. ही वेळ बसून गप्पा मारण्याची नाही तर त्या मजुरांसाठी वाहतुकीची सोय करून देण्याची आहे, असा खोचक सल्ला त्यांनी राहुल गांधी यांना दिला होता. आज राहुल गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर मजुरांशी संवाद साधत असलेल्या व्हि़डिओ शेअर केला आहे. हरयाणाहून झांसीकडे पायी निघालेल्या स्थलांतरित मजुरांचे दु:ख राहुल गांधी जाणून घेत आहेत. हा चर्चेचा व्हिडिओ त्यांनी आज सकाळी ९ वाजता शेअर असून या व्हिडिओत मजुरांनी आपल्याला येत असलेल्या अडचणी राहुल गांधी यांना सांगितल्या आहेत.

मजुरांच्या समस्या जाणून घेतल्या 

हे स्थलांतरित मजूर ७०० किमीचा प्रवास पायी करत असून राहुल गांधी यांनी त्यांना वाटेतच विश्रांती घेत असताना त्यांच्याशी संवाद साधला आहे. त्या प्रश्नांची उत्तरे देत या मजुरांनी आपल्याला येत असलेल्या अडचणी सांगितल्या. त्यांच्याशी बोलताना, केंद्र सरकारने तर प्रत्येकाच्या बँक खात्यावर पैसे टाकलेले आहेत, ते आपल्याला मिळाले नाहीत का?, असा प्रश्न केला. मात्र, आम्हाला एक रुपयाही मिळालेला नसल्याचे मजुरांनी सांगितले. राहुल गांधी यांनी १६ मे या दिवशी सुखदेव विहार फ्लायओव्हरजवळ या स्थलांतरित मजुरांशी चर्चा केली. त्यानंतर आपण ही व्हिडिओ २३ मे रोजी सकाळी ९ वाजता प्रसिद्ध करू, असे ट्विट करत जाहीर केले होते.

हेही वाचा –

देशात गेल्या २४ तासांत ६,६५४ नव्या रुग्णांची नोंद; १३७ जणांचा मृत्यू

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here