Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश हाफ चड्डी घालून नागपूरमधून भाषण देणं राष्ट्रवाद नाही - सचिन पायलट

हाफ चड्डी घालून नागपूरमधून भाषण देणं राष्ट्रवाद नाही – सचिन पायलट

Related Story

- Advertisement -

शेतकरी आंदोलानवरुन राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्ला चढवला. शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विचार करणं हा खरा राष्ट्रावाद आहे. हाफ चड्डी घालून नागपूरमधून भाषण देणं राष्ट्रवाद नाही आहे, अशा तिखट शब्दांत सचिन पायलट यांनी RSS वर टीकेची तोफ डागली. जयपूर येथे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राजस्थान काँग्रेस आंदोलन करत आहे. यावेळी सचिन पायलट यांनी भाषण करताना संघावर टीका केली आहे. “जर तुम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणाची भाषा करत असाल तर तो खरा राष्ट्रवाद आहे. नागपूरमधून हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देणं हा राष्ट्रवाद नव्हे.” भाजपा शेतकऱ्यांचं भविष्य अंधारात ढकलत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, बऱ्याच महिन्यांनी सचिन पायलट आणि अशोक गेहलोत एकाच मंचावर दिसले.

- Advertisement -

सचिन पायलट यांनी भाजपवर देखील सडकून टीका केली. “आत्ताच्या काळात तुम्ही ‘लव्ह जिहाद’ या विषयावर बोलता. विवाहासंबंधी कायदे करत आहात आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचं भविष्य अंधारात ढकलत आहात. इतिहास साक्षी आहे, देशात बहुतेक शेतकरी नेते हे काँग्रेस पक्षाचे होते. तर काही मोजकेच इतर पक्षाचे होते. भाजपमध्ये तर एकही शेतकरी नेता नाही आणि होऊही शकणार नाही. मला याचं वाईट वाटतं की सध्या देशातील शेतकरी केवळ आंदोलनच करत नाहीत तर त्यांच्या मनात भीती देखील आहे. त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या भविष्याची त्यांना चिंता आहे,” असं सचिन पायलट म्हणाले.

 

- Advertisement -